Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 8 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 08:37 AM2020-01-08T08:37:51+5:302020-01-08T08:38:18+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
वृषभ राशीत जन्मलेली आजची मुले 27 क. 49 मि. पर्यंतची राहतील. त्यापुढे मिथुन राशीत मुलांचा जन्म होईल. बुध-नेपच्यून शुभयोगामुळे मुलांचे विचार आणि कर्तृत्व विकसित होईल. प्रयत्नाने त्यास आकर्षक आकार देता येईल. बौद्धिक प्रांतातून अधिक प्रभाव निर्माण होईल.
वृषभ राशी ब, व, ऊ
मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, 8 जानेवारी 2020
भारतीय सौर 18 पौष 1941
मिती पौष शुद्ध त्रयोदशी 27 क. 44 मि.
रोहिणी नक्षत्र, 15 क. 54 मि., वृषभ चंद्र
सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 15 मि.
प्रदोष
दिनविशेष
1909 - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म.
1924 - सामाजिक कार्यकर्त्या, कम्युनिस्ट नेत्या गीता मुखर्जी यांचा जन्म.
1939 - अभिनेत्री नंदा यांचा जन्म.
1942 - भौतिकशास्त्रज्ञ, लेखक स्टीफन हॉकिंग यांचा जन्म.
1945 - मराठी लेखिका प्रभा गणोरकर यांचा जन्म.
1984 - पहिली भारतीय वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.
1994 - 68 वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.