Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 9 फेब्रुवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 09:38 AM2020-02-09T09:38:06+5:302020-02-09T09:38:28+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
पंचाग
रविवार, दि. 9 फेब्रुवारी 2020
- भारतीय सौर 20 माघ 1941
- मिती माघ शुद्ध पौर्णिमा 13 क. 3 मि.
- आश्लोषा नक्षत्र 19 क. 43 मि., कर्क चंद्र
- सूर्योदय 7 क. 11 मि., सूर्यास्त 6 क. 35 मि.
दिनविशेष
1874 - स्वातंत्र्यशाहीर, कवी गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद यांचा जन्म.
1944 - आयुर्वेदाचार्य पुरूषोत्तम गणेश नानल यांचे निधन.
1958 - हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह यांचा जन्म.
1966 - बालमोहन नाटकाचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.
1968 - अभिनेता राहुल रॉय यांचा जन्म.
1979 - दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते राजा परांजपे यांचे निधन.
2000 - अभिनेत्री शोभना समर्थ यांचे निधन.
2006 - अभिनेत्री नादिरा यांचे निधन.
आज जन्मलेली मुलं...
19 क. 43 मि. पर्यंत कर्क राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतरची मुले सिंह राशीच्या संपर्कात राहातील. कल्पकता आणि परिश्रम यांच्यातून सफलता संपादन करू शकतील. त्यात शिक्षण ते व्यवहार असा प्रवास राहील. कर्क राशी उ, ह अद्याक्षर. सिंह राशी म, ट अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी