Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 27 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 08:20 AM2019-12-27T08:20:22+5:302019-12-27T08:20:26+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?
आजचे पंचाग
शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2019
भारतीय सौर 06 पौष 1941
मिती मार्गशीष शुद्ध प्रतिपदा 10 क. 40 मि.
पूर्वाषाढा नक्षत्र 17 क. 30 मि., धनु चंद्र 23 क. 45 मि.
सूर्योदय 07 क. 11 मि., सूर्यास्त 06 क. 08 मि.
ग्रहण कारिदिन.
आज जन्मलेली मुलं
23 क. 45 मि. पर्यत धनु राशीची मुले आहेत. पुढे मकर राशीत मुलांचा जन्म होईल. रवि-गुरु युतीमुळे मुलांची प्रगती आकर्षक राहील. त्यात व्यवहार असेल आणि अध्यात्म राहील. त्यामुळे कार्यप्रांत व्यापक होत राहतील. मातापित्यास शुभ. धनु राशी भ, ध अद्याक्षर. मकर राशी ज, ख अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1797- प्रख्यात उर्दू शायर मिर्झा गालिब यांचा आग्रा येथे जन्म.
1822- सूक्ष्मजंतु शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म.
1898- कृषी व शिक्षणतज्ज्ञ पंजाबराव देशमुख यांचा जन्म.
1911- काँग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.
1965- 'ज्ञानोदय'चे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.
1965- प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा जन्म.
1997- पार्श्वगायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.
2002- गायिका प्रतिमा बरुआ- पांडे यांचे निधन.