Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 01 नोव्हेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 08:22 AM2019-11-01T08:22:32+5:302019-11-01T08:23:03+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुलं
आज जन्मलेली मुलं धनु राशीची असतील आणि चंद्र- हर्षल नवपंचमयोगाच्या शुभ परिणांमुळे कार्यप्रांतात चमकत राहतील. आयुष्यातील अनेक शुभ घटना अनपेक्षित कृतीत येतील, त्याचे प्रतिसाद महत्वाच्या प्रांतात उमटतील. माता पित्यास शुभ. धनु राशी भ, ध आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, 01 नोव्हेंबर 2019
भारतीय सौर, 10 कार्तिक 1941
मिती कार्तिक शुद्ध पंचमी 24 क. 51 मि.
मूळ नक्षत्र 11 क. 52 मि. धनु चंद्र 21 क. 31 मि.
सूर्योदय 06 क. 40 मि., सूर्यास्त 06 क. 04 मि.
पांडवा पंचमी
दिनविशेष
1919- सुप्रसिद्ध मराठी अभिनेते शरद तळवलकर यांचा जन्म.
1926- संगीतकार यशवंत देव यांचा जन्म.
1932- प्रख्यात कवी अरुण कोल्हटकर यांचा जन्म.
1940- सर्वोच्च न्यायाधीश रमेशचंद्र लाहोटी यांचा जन्म.
1945- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म.
1963- उद्योजिका नीता अंबानी यांचा जन्म.
1973- म्हैसूरचे नाव कर्नाटक, तर लखदीप, मिनिकॅाय, अग्निदेव बेटांचे नाव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.
1973- प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा जन्म.
1974- भारतीय फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा जन्म.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी 6 प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराचा सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासून पुढे करावा.
दिवसा- सकाळी 6 ते 7.30 चंचल, 7.30 ते 9 लाभ, 9 ते 10.30 अमृत, 10.30 ते 12 काल, 12 ते 1.30 शुभ, 1.30 ते 3 रोग, 3 ते 4.30 उद्येग, 4.30 ते 6 चंचल. रात्री- 6 ते 7.30 रोग, 7.30 ते 9 काल, 9 ते 10.30 लाभ, 10.30 ते 12 उद्येग, 12 ते 1.30 शुभ, 1.30 ते 3 अमृत, 3 ते 4.30 चंचल, 4.30 ते 6 रोग.