Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, दि. 30 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 07:27 AM2019-07-30T07:27:52+5:302019-07-30T07:28:14+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुलं
मिथुन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांचा कार्यपथावरील प्रवास चंद्र- नेपच्यून नवपंचम योगामुळे सफल होत राहील. परिवार ते व्यवहार त्यांचे केंद्र राहतील. साहस आणि स्पर्धा यामध्ये सावध रहावे. चंद्र- शनि प्रतियोग आहे. मिथुन क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
मंगळवार, दि. 30 जुलै 2019
- भारतीय सौर 8 श्रावण 1941
- मिती आषाढ वद्य त्रयोदशी 14 क. 50 मि.
- आर्द्रा नक्षत्र 16 क. 47 मि. मिथुन चंद्र
- सूर्येदय 06 क. 16 मि., सूर्यास्त 07 क. 14 मि.
- शिवरात्र
दिनविशेष
1928- मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सोज्जवळ सौंदर्य व अजोड अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री सुलोचना यांचा कोल्हापूर येथे जन्म.
1960- कर्नाटक सिंह या नावाने प्रसिद्ध असणारे स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन.
1969- प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी यांचा मेरठ येथे जन्म.
1973- सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा जन्म.
1983- श्रेष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन.
1994- मराठी कथाकार शंकर पाटील यांचे निधन.
2011- संगीतकार, गायक डॅा. अशोक दामोदर रानडे यांचे निधन.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवसा - सकाळी 6 ते 7.30 रोग, 7.30 ते 9 उद्धेग, 9 ते 10.30 चंचल, 10.30 ते 12 लाभ, 12 ते 1.30 अमृत, 1.30 ते 3 काल, 3 ते 4.30 शुभ, 4.30 ते 6 रोग. रात्री - 6 ते 7.30 काल, 7.30 ते 9 लाभ, 9 ते 10.30 उद्धेग, 10.30 ते 12 शुभ, 12 ते 1.30 अमृत, 1.30 ते 3 चंचल, 3 ते 4.30 रोग, 4.30 ते 6 काल.