Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 16 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 11:02 AM2019-12-16T11:02:44+5:302019-12-16T11:03:44+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?
आजचे पंचांग
सोमवार, दि. 16 डिसेंबर 2019
भारतीय सौर 25, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष वद्य चतुर्थी 05 क. 35 मि.
आश्लेषा नक्षत्र 26 क. 47 मि., कर्क चंद्र 26 क. 47 मि
सूर्योदय 07 क. 05 मि. सूर्यास्त 06 क. 03 मि.
दिनविशेष
1854 - भारतातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पुण्यात स्थापना.
1929 - प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.
1933 - लोकसाहित्य अभ्यासक, लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.
1965 -जगप्रसिद्ध लेखक, नाटककार डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचे निधन.
1971 - बांगलादेशचा विजय दिवस.
2002 - शकीलाबानू भोपाली या गायिकेचे निधन.
2004 - विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन.
आज जन्मलेली मुलं
कर्क राशीत आज जन्मलेल्या मुलांचा 26 क. 47 मि. पर्यंत प्रांत राहील. त्यानंतर मुले सिंह राशीत जन्मास येतील. प्रवाहाशी समरस होणारी आणि निर्धाराने यश संपादन कार्यपद्धती राहील. परिचितांचा परिवार विशेष स्वरुपाचा असू शकेल. मातापित्यास शुभ. कर्क राशी 'ड', 'ह' अद्याक्षर. सिंह राशी 'म', 'ट' आद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी