Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:44 AM2020-02-17T08:44:43+5:302020-02-17T08:45:58+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
17 फेब्रुवारी 2020: 29 क. 14 मि. पर्यत वृश्चिक राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर मुलांचा जन्म धनु राशीत राहील. प्रयत्नांती परमेश्वर हाच व्यावहारिक यशाचा मंत्र राहील. शिक्षण, उद्योग, अधिकार त्याची केंद्रे असतील. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर. धनु राशी भ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 28 माघ 1941
मिती माघ वद्य नवमी 14 क. 36 मि.
वृश्चिक चंद्र 29 क. 14 मि.
सूर्योदय 7 क. 7 मि., सूर्यास्त 6 क. 38 मि.
दिनविशेष
1600- बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल जिओर्डानो ब्रुनो याला क्रुसावर बांधून जाळण्यात आले.
1740- गिर्यारोहक, भूशास्त्रज्ञ आणि माँतब्लॉकवर प्रथम पाऊल ठेवणारा माणूस होरेस द सॉसूर याचा जन्म.
1883- क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे एडन तुरुंगात निधन.
1978- कथा कादंबरीकार पुरोषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन.
1986- सुप्रसिद्ध भारतीय तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन.