Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 30 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 10:14 AM2020-03-30T10:14:00+5:302020-03-30T10:14:29+5:30
कशी असतील आज जन्मलेली मुले, कसा होईल प्रवास
आजचे पंचांग
सोमवार दि. 30 मार्च 2020
भारतीय सौर 10 चैत्र 1942
मिती चैत्र शुद्ध षष्ठी, 27 क. 15 मि.
रोहिणी नक्षत्र 17 क. 18 मि.
वृषभ चंद्र 30 क. 06 मि.
सूर्योदय 06 क. 35 मि., सूर्यास्त 06 क. 51 मि.
आज जन्मलेली मुले
30 क. 06 मि. पर्यंत जन्मलेली मुलं वृषभ राशीत असतील. त्यानंतर मिथुन राशीच्या मुलांना प्रारंभ होईल. मंगल-शनी युतीमुळे कार्यमार्ग निर्दोष ठेवण्यासाठी युक्तीचा सतत उपयोग करावा लागतो. व्यवहारात संयम, शिक्षणात एकाग्रतआवश्यक असते. वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे दिनविशेष
1842 - शरीराचा एखादा भाग बधिर करून शस्त्रक्रिया करण्याचा पहिला प्रयोग क्रॉवफोर्ड लॉंग यांनी अमेरिकेतील जेफर्सन येथे केला.
1908 - प्रख्यात चित्रपट अभिनेत्री देविकाराणी यांचा जन्म
1909 - 1909 लेखक आणि कादंबरीकर शंकर दाजीशास्त्री पदे यांचे प्रयाग येथे निधन
1942 - मराठी लेखक वसंत आबाजी डहाके यांचा जन्म
1989 - ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार व सोबत या साप्ताहिकाचे ग. वा. बेहरे यांचे पुणे येथे निधन
1993 - रंगांचे जादूगार व नामवंत चित्रकार एस. एम. पंडित यांचे निधन
2002 - हिंदी चित्रपट गीतकार आनंद बक्षी यांचे निधन