Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 28 ऑक्टोबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 08:34 AM2019-10-28T08:34:37+5:302019-10-28T08:34:49+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
तुला राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि- हर्षल प्रतियोगामुळे समस्यांशी सामना करीत यश मिळवावे लागणार आहे. पराक्रमी गुरुच्या शुभ सहकार्यामुळे अखेर सफलता मिळेल. त्यात शिक्षण ते उद्योग विभाग असतील. तुला राशी 'र', 'त' अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 06 कार्तिक 1941
मिती आश्विन वद्य अमावस्या 09 क. 08 मि.
स्वास्ती नक्षत्र 25 क. 00 मि., तुला चंद्र
सूर्योदय 06 क. 36 मि., सूर्यास्त 06 क. 07 मि.
बालप्रतिपदा, पाडवा
दिनविशेष
1636 - अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठाची स्थापना.
1811- संस्थानिक यशवंतराव होळकर यांचे निधन
1867- स्वामी विवेकानंदाच्या पाश्चात्य शिष्या मागरिट नोबेल ऊर्फ भागिनी निवेदिता यांचा जन्म.
1893- मराठीतील श्रेष्ठ कवी गिरीश (शंकर केशव कानिटकर) यांचा जन्म.
1900- जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचा मृत्यू
1914- पोलिओ प्रतिबंधक लसीचे निर्माते जोनास साल्क यांचा जन्म.
1955- मायक्रोसॅाफ्ट कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांचा जन्म.
1958- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी 6 प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराचा सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासून पुढे करावा.
दिवसा- सकाळी 6 ते 7.30 अमृत, 7.30 ते 9 काल, 9 ते 10.30 शुभ, 10.30 ते 12 रोग, 12 ते 1.30 उद्येग, 1.30 ते 3 चंचल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 अमृत. रात्री- 6 ते 7.30 चंचल, 7.30 ते 9 रोग, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 लाभ, 12 ते 1.30 उद्येग, 1.30 ते 3 शुभ, 3 ते 4.30 अमृत, 4.30 ते 6 चंचल.