Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 28 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 07:50 AM2019-07-28T07:50:36+5:302019-07-28T07:50:40+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुलं
वृषभ राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र शुक्र शुभायोगाचे सहकार्य काही प्रांतात प्रबल करणार आहे. त्यात प्रतिष्ठतांचा सहभाग आकर्षकता निर्माण करील. चंद्र नेपच्यून केंद्रयोग असल्यामुळे उपक्रमात फसवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी. वृषभ राशी 'ब' व 'ऊ' आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
रविवार, दि. 28 जुलै 2019
- भारतीय सौर 6 श्रावण 1941
- मिती आषाढ वद्य एकादशी 18 क. 50 मि.
- भरणी नक्षत्र 18 क. 57 मि. वृषभ चंद्र
- सूर्योदय 06 क. 15 मि., सूर्यास्त 07 क. 15 मि.
- कामिका एकादशी
दिनविशेष
1947 - भारताचा बिलियर्डपटू सुभाष अग्रवाल यांचा जन्म.
1972 - हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा जुल्का हिचा जन्म.
1977 - गायक, अभिनेते गोविंद परशुराम तथा पंडितराव नगरकर यांचे निधन.
1981 - मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू तथा बाबूराव गोखले यांचे निधन.
1983 - अभिनेता व गायक व्यंकटेश प्रभू कस्तुरीराजा तथा धनुष याचा जन्म.
1986 - अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा जन्म.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवसा - सकाळी 6 ते 7.30 उद्धेग, 7.30 ते 9 चंचल, 9 ते 10.30 लाभ, 10.30 ते 12 अमृत , 12 ते 1.30 काल, 1.30 ते 3 शुभ, 3 ते 4.30 रोग, 4.30 ते 6 उद्धेग. रात्री - 6 ते 7.30 शुभ, 7.30 ते 9 अमृत, 9 ते 10.30 चंचल, 10.30 ते 12 रोग, 12 ते 1.30 काल, 1.30 ते 3 लाभ, 3 ते 4.30 उद्धेग, 4.30 ते 6 शुभ.