Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 12 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 09:45 AM2020-03-12T09:45:31+5:302020-03-12T09:45:48+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
तुला राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र- बुध नवपंचम योगाच्या सहवासामुळे विचार ते विचारवंत अशा कार्यप्रांतात प्रवास करू शकतील. योजना, उपक्रम, वेळापत्रक यांचा समन्वय मात्र कोठेही दूषित करू नये. परदेशाशी संपर्क शक्य आहे. तुला राशी र, त अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार दि. 12 मार्च 2020
भारतीय सौर 22 फाल्गुन 1941
मित्ती फाल्गुन वद्य तृतीया 11 क. 59 मि.
चित्रा नक्षत्र 16 क. 16 मि., तुला चंद्र
सूर्योदय 06 क. 50 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि.
संकष्टी चतुर्थी(चंद्रोदय 21 क. 39 मि.)
दिनविशेष
1891 नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म
1911 गोवा, दमण-दीव केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांचा जन्म
1911 कृष्णाजी प्र. खाडिलकर यांच्या संगीत मानापमानचा पहिला प्रयोग
1913 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म
1930 मिठाच्या सत्याग्रहासाठी 240 मैल अंतराची महात्मा गांधीजींची दांडी यात्रा सुरू झाली.
1984 प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिचा जन्म
1993 मुंबईत शेअर बाजार, एअर इंडिया, सेंच्युरी बझार आदी 12 ठिकाणी शक्तिशाली बॉम्बस्फोट