Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 26 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 08:59 AM2019-09-26T08:59:09+5:302019-09-26T08:59:33+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुले - कर्क राशीतील मुले 6.40 वाजेपर्यंत त्या राशीत राहतील, त्यानंतर मुले सिंह राशीत प्रवेश करतील. प्रवाह आणि प्रवास यांच्याशी समरस होऊन मुले शिक्षण ते उद्योग असा प्रवास सुरू ठेवतील. स्वतःची प्रतिष्ठेची वर्तुळं तयार करतील. कर्क ड, हे, सिंह राशी. म, ट अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
गुरुवार, दि. 26 सप्टेंबर 2019
भारतीय सौर 4 आश्विन 1941
मिती भाद्रपद वद्य द्वादशी 11 क. 3 मि.
आश्लेषा नक्षत्र 6 क. 40 मि., कर्क चंद्र 6 क. 40 मि.
सूर्योदय 06 क. 29 मि., सूर्यास्त 06 क. 31 मि.
प्रदोष
आजचे दिनविशेष -
1820- शिक्षणतज्ज्ञ,समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म
1923- अभिनेता देव आनंद यांचा जन्म
1931- माजी क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचा जन्म
1932- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा वाढदिवस
1956- किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन
1977- नृत्यकार उदय शंकर यांचे निधन
1989- संगीतकार हेमंतकुमार यांचे निधन
1996- नाटककार विद्याधर गोखले यांचे निधन
2002- मराठी संगीतकार राम फाटक यांचे निधन
1894- गांधीवादी तत्तचिंतक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर यांचा जन्म