Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 30 ऑक्टोबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 08:22 AM2019-10-30T08:22:27+5:302019-10-30T08:22:34+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
वृश्चिक राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना बुध- शुक्र युतीचे प्रतिसाद स्वत;चा प्रभाव प्रस्थापित करण्यास उपयुक्त ठरतील. त्यात बौद्धिक प्रांत राहील. कला संगीताचा समावेश होऊ शकतो. व्यवहार आकर्षक होत राहतील. वृश्चिक राशी 'न', 'य' अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 08 कार्तिक 1941
मिती आश्विन शुद्ध तृतीया 26 क. 02 मि.
अनुराधा नक्षत्र 21 क. 49 मि. वृश्चिक चंद्र
सूर्योदय 06 क. 39 मि., सूर्यास्त 06 क. 05 मि.
दिनविशेष
1909 - अणुशास्त्रज्ञ होमी जहाँगीर भाभा यांचा जन्म.
1922- इटलीचे बेनिटो मुसोलिनी राष्ट्रप्रमुख बनले.
1949- भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांचा जन्म.
1960- फुटबॅालपटू दिएगो मॅराडोना यांचा जन्म.
1966- शिवजी पार्कवर शिवसेनेचा पहिला मेळावा.
1974- गझल गायिका मालिका ए- गझल बेगम अख्तर यांचे निधन.
1990- चित्रपती व्ही. शांताराम यांचे निधन.
1998- मराठी साहित्यिक, दिग्दर्शक बेडेकर यांचे निधन.
2011- उद्योजक अरविंद मफचलाल यांचे निधन
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी 6 प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराचा सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासून पुढे करावा.
दिवसा- सकाळी 6 ते 7.30 लाभ, 7.30 ते 9 अमृत, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 शुभ, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 उद्येग, 3 ते 4.30 चंचल, 4.30 ते 6 लाभ. रात्री- 6 ते 7.30 उद्येग, 7.30 ते 9 शुभ, 9 ते 10.30 अमृत, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 काल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 उद्येग.