Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 30 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 08:55 AM2019-04-30T08:55:31+5:302019-04-30T08:57:08+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
28 क. 15 मि. पर्यंत जन्मलेली मुलं कुंभ राशीत असतील. त्यानंतर मीन राशीची मुलं जन्म घेतील. विज्ञान ते विकास असा त्यांचा प्रवास सुरू राहील. त्यात शिक्षण आणि व्यवहाराचा समावेश राहील. संपर्काचा विस्तार मोठा राहील.
कुंभ राशी ग, स
मीन राशी द, च अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचाग
मंगळवार, दि. 30 एप्रिल 2019
भारतीय सौर 10 वैशाख 1941
मिती चैत्र वद्य एकादशी 24 क. 18 मि.
शततारका नक्षत्र 08 क. 14 मि.
कुंभ चंद्र 28 क. 15 मि.
सूर्योदय 06 क. 13. मि, सूर्यास्त 06 क. 59 मि.
दिनविशेष
1870 - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद तथा दादासाहेब फाळके यांचा जन्म.
1909 - माणिक बंडोजी इंगळे तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अमरावती जिल्ह्यातील यावली येथे जन्म.
1926 - ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म.
1936 - सेवाग्राम आश्रमाची सुरुवात.
1945 - जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याचे निधन.
1957 - भारतीय संस्कृतिकोश मंडळाची स्थापना.
1987 - भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याचा जन्म.
2003 - एकपात्री प्रयोगातून इतिहास जागविणारे लेखक व पत्रकार वसंत पोतदार यांचे निधन.