Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 24 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 07:57 AM2020-01-24T07:57:24+5:302020-01-24T07:57:36+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुलं - ०७ क. ४० मि. पर्यंत मुले धनु राशीत असतील. त्यानंतर मुलांचा प्रवेश मकर राशीत होईल. सरळ विचार आणि व्यवहारी कृती मुलांचा ध्येयमार्ग राहील. शिकस्तीच्या प्रयत्नाने यश संपादन करावे लागेल. पुढे यश मिळत राहते. धनु राशी भ, ध, मकर राशी ज, ख अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२०
भारतीय सौर ०४ माद्य १९४१
मिती पौष वद्य अमावास्या २७ क. १२ मि.
उत्तराषाढा नक्षत्र २६ क. ४६ मि., धनु चंद्र ०७ क. ४० मि.
सूर्योदय ०७ क. १६ मि., सूर्यास्त ०६ क. २६ मि.
दर्श अमावास्या
आजचे दिनविशेष
१९२३ - अभिनेत्री रत्ना साळगावकर उर्फ हंसा वाडकर यांचा जन्म
१९२४ - तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पु रेगे यांचा जन्म
१९४५ - प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म
१९६६ - आल्प्स पर्वतात बोईंग ७०७ च्या अपघातात शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांचे निधन
२००२ - कोऊर येथून एरियन-४ या अग्निबाणाने भारताचा उपग्रह इन्सॅट ३ सीचे यशस्वी प्रक्षेपण केले
२०११ - शास्त्रीय गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे निधन