आजचे राशीभविष्य 21 जून 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 07:26 AM2019-06-21T07:26:55+5:302019-06-21T07:27:41+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या.
मेष - घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आणखी वाचा
वृषभ - व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. आणखी वाचा
मिथुन - अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौजमजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. आणखी वाचा
सिंह - आज घरात हर्ष आणि आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा
कन्या - चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. आणखी वाचा
तूळ - आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या तब्बेतीची काळजी राहील. आणखी वाचा
वृश्चिक - कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. आणखी वाचा
धनु - द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. आणखी वाचा
मकर - नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा
कुंभ - कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारे आणि मित्रांकडून लाभ होईल. आणखी वाचा