आजचे राशीभविष्य - 31 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 07:42 AM2019-03-31T07:42:10+5:302019-03-31T07:42:28+5:30
जाणून घ्या, कसे आहे तुमचे आजचे भविष्य
मेष - घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आज आप्त, इष्ट आणइ मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार- धंदयासंबंधी प्रवास होईल आणि त्यात लाभ होईल.
वृषभ - व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्या वार्ता आपणाला भावविवश बनवतील.
मिथुन - अनियंत्रित रागाला लगाम घाला . बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबातील व्यक्ती आणि ऑफिसातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंगे येतील.
कर्क -आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौजमजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. मौजमस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल.
सिंह - उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील.
कन्या - चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.
तूळ - आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या तब्बेतीची काळजी राहील.
वृश्चिक - कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील.
धनु - द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही.
मकर - नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. तब्बेत चांगली राहील.
कुंभ - कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता.
मीन - आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारे आणि मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल.