वास्तू टिप्स - भाग 10
By admin | Published: August 22, 2016 01:19 PM2016-08-22T13:19:56+5:302016-08-22T13:19:56+5:30
घराची डोअर बेल ही पालीचा चूक-चूक आवाज करणारी बसु नये हे अशुभ आहे. घराची डोअर बेल ही घंटेचा आवाज करणारी असावी हे शुभ असते.
Next
>मकरंद सरदेशमुख
- सेफ्टी डोअरचा कलर काळ्या रंगाचा असु नये क्रिम, ऐवरी या रंगाचे सेफ्टी डोअर हवेत.
- घराची डोअर बेल ही पालीचा चूक-चूक आवाज करणारी बसु नये हे अशुभ आहे .
- घराची डोअर बेल ही घंटेचा आवाज करणारी असावी हे शुभ असते .
- घराची डोअर बेल कोणत्याही मंत्राची किंवा आरतीची नसावी या अपुर्ण वाजल्यामुळे या मंत्र सामर्थ्याचा घराला काही उपयोग होत नाही .
- सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजांना महिन्यातून एकदा ऑईलिंग करून घ्यावे दरवाजातून कर-कर आवाज येणे हे अशुभ लक्षण आहे .
- घरामध्ये स्वयंपाक घर किंवा इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकनार याची काळजी घ्यावी पाणी टपकने अशुभ मानले जाते .
- घरामध्ये किंवा घराच्या बाहेर चप्पल ,शुज कधी पालथ्या पडु देऊ नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढून त्रास होऊ शकतो .
- घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा असु नये कारण मुख्य दरवाजातून चांगली उर्जा बाहेर परावर्तित होते .
- विंड चाइमचा (पवन घंटी) मधुर आवाज मनाला शांती देतो दु:ख दुर करतो संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो .
- विंड चाइम (पवन घंटी) ही सहा पाईपची घराच्या वायव्य दिशेला लावावी .
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)