वास्तू टिप्स - भाग 13
By Admin | Published: August 22, 2016 01:25 PM2016-08-22T13:25:17+5:302016-08-22T13:25:17+5:30
कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर काळे, निळे, लाल, मरून या डार्क रंगाचे नसावेत. कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर व्हाईट, हाफ व्हाईट, ऐवरी, क्रिम या रंगाचे असावेत.
>मकरंद सरदेशमुख
- कार किंवा टू - व्हिलर पार्क करताना उत्तर आणि पुर्व दिशेला तोंड करून पार्क करावी.
- कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर काळे, निळे, लाल, मरून या डार्क रंगाचे नसावेत.
- कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर व्हाईट, हाफ व्हाईट, ऐवरी, क्रिम या रंगाचे असावेत.
- घराच्या खिडक्या पुर्व आणि उत्तर दिशेला असाव्यात म्हणजे सुर्य प्रकाश जास्तीत जास्त घरामध्ये येतो .
- घराला रंग रंगोटी करताना घराच्या दक्षिण व पश्चिम भिंतीला डार्क रंग संगती करू शकता .
- महिन्यातुन एक ते दोन वेळा घरामध्ये गोमुत्र सिंचन करावे .
- घरातील देवघर बाथरूम किंवा टॉयलेटच्या बाजुला ठेवु नये.
- हॉल , किचनमध्ये बांबु - ट्री लावल्याने तेथील नकारात्मक उर्जा कमी होते .
- घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा कलश ठेवावा त्यामुळे घरामध्ये सुख - समृद्धी येते.
- बेडरूमच्या बाहेरील भिंतींवर चिरा पडु देऊ नयेत यामुळे घरामधील अडचणी वाढू शकतात.
- घरातील समोरच्या भागात, बालकनीमध्ये काटेरी किंवा टोकदार पानाचे रोप लावु नये हे रोप नकारात्मक उर्जा प्रदान करते.
- घरामध्ये तुटलेल्या मुर्तीचे विसर्जन करावे ,विसर्जनाच्या आगोदर विधिवत पुजा करून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे.
- वास्तुनुसार प्रवेशद्वार सदैव घराच्या आत उघडणारे हवे मुख्यद्वार दोन भागांमध्ये विभागणारे नसावेत.
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)