वास्तू टिप्स - भाग 16
By Admin | Published: February 27, 2017 05:02 PM2017-02-27T17:02:34+5:302017-02-27T17:02:52+5:30
नवीन घर विकत घेताना साउथ - वेस्ट एन्ट्री असणारे घर विकत घेऊ नये यामुळे धनहानी होते.
>- मकरंद सरदेशमुख
- नवीन घर विकत घेताना साउथ - वेस्ट एन्ट्री असणारे घर विकत घेऊ नये यामुळे धनहानी होते.
- नवीन घर विकत घेताना आग्नेय दिशेचा एन्टरन्स असणारे घर विकत घेऊ नये त्यामुळे आरोग्य हानी , धन हानी , चिड - चिड अशा गोष्टी घरामध्ये होतात .
- दक्षिणेचा एन्टरन्स असणारे घर विकत घेऊ नये त्यामुळे पैसे टिकत नाही , फायनानशियल प्रोब्लेम येतात , कोर्ट कचेऱ्या पाठीमागे लागतात .
- घराच्या दक्षिण - पश्चिमेला खड्डा किंवा उतार असु नये किंवा करू नये यामुळे वास्तु मध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते .
- घराच्या उत्तर दिशेला जड कपाटे , धान्याची पोती भरपुर वजन असणारे सामान किंवा जडत्व व अग्नितत्वा संबंधीत कोणत्याही गोष्टी ठेवु नये .
- घराच्या मुख्य दरवाजा समोर देवघर ठेवु नये त्यामुळे देवाचे पावित्र्य भंग होते आणि पुजा केल्याची फल प्राप्ती मिळत नाही .
- घराच्या मुख्य दरवाजा समोर किचन किंवा डायनिंग टेबल येऊ देवु नये .
- घराच्या मुख्य दरवाजाच्या आत किंवा बाहेर खांब ,भिंत ,उंच झाड ,तुळशी वृंदावन अशा कोणत्याही गोष्टी ठेवु नयेत.
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)