वास्तू टिप्स भाग 8
By admin | Published: August 17, 2016 04:51 PM2016-08-17T16:51:40+5:302016-08-17T16:51:40+5:30
ऑफिसच्या आजुबाजूच्या परिसरामध्ये खड्डा ,चढ-उतार ,उंच वाढणारी झाडी अशा गोष्टी येऊ देऊ नयेत.
Next
>मकरंद सरदेशमुख
- ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे आणि जागा सुद्धा रिकामी ठेवावी.
- ऑफिसच्या आजुबाजूच्या परिसरामध्ये खड्डा ,चढ-उतार ,उंच वाढणारी झाडी अशा गोष्टी येऊ देऊ नयेत.
- ऑफिसमध्ये खुप मोठे देवघर ठेवु नये देवाचा छोटासा फोटो ठेवावा.
- ऑफिसमध्ये इन्वरटर , यु . पी . एस बॅटरी आग्नेय दिशेला असावेत.
- ऑफिसमध्ये टॉयलेट हे वायव्य दिशेला असावे.
- देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे.
- घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पुजा करताना आपले तोंड पुर्वे दिशेला करावे.
- गणपती बाप्पाची मुर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पुजा करताना आपले तोंड पुर्वे दिशेला करावे.
- देवघरामध्ये एका देवाच्या दोन किंवा तीन मुर्ती कधीही ठेवु नये प्रत्येक देवाची एक मुर्ती ठेवावी.
- देवघरामध्ये उदबत्ती ,निरंजन आणि समई देवघराच्या आग्नेयेला ठेवावी.
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)