वास्तू टिप्स - भाग 9
By admin | Published: August 17, 2016 04:52 PM2016-08-17T16:52:59+5:302016-08-17T16:52:59+5:30
घरामध्ये जाळ्या-जळमटे कोळ्यांची घरटी लागु देऊ नये जाळ्या जळमटे मध्ये राहु केतु या पाप ग्रहांचे अस्तित्व असते.
Next
>मकरंद सरदेशमुख
- सुख - समृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावी.
- दक्षिण दिशेचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची उंच झाडे लावावीत.
- घरामध्ये जाळ्या-जळमटे कोळ्यांची घरटी लागु देऊ नये जाळ्या जळमटे मध्ये राहु केतु या पाप ग्रहांचे अस्तित्व असते.
- झुरळे ,मुंग्या ,ढेकुण ,पाली हे घरात होणे म्हणजे अशुभाचे संकेत आहेत वेळच्या वेळी पेस्ट कंट्रोल करावे.
- खराब झालेल्या वस्तु शिळे अन्न ,भुरा लागलेले खाद्य पदार्थ यांचा संग्रह करू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते.
- शुभलक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक आणि घराच्या आतुन बाहेरून गणपतीची टाईल्स लावावी.
- घराचा उंबरा काळ्या कडाप्याचा लावू नये लाकडी सागवानी असावा.
- घराचा उंबरा पांढरे मार्बल ,प्लायवुड किंवा जंगली लाकडापासून बनवलेला नसावा.
- घराच्या मुख्य दरवाजातील पायपुसणी हिरव्या ,निळ्या ,पिवळ्या ,क्रिम कलरची असावी.
- घराच्या मुख्य दरवाजातील पायपुसणी लाल ,काळ्या ,मरून रंगाची नसावी.
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)