नव्या जगाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:51 AM2020-04-09T05:51:22+5:302020-04-09T05:51:26+5:30

ड्यात राहणारे पक्ष्याचे पिल्लू बाहेरच्या जगाबद्दल काय जाणणार?

Visions of the New World | नव्या जगाचे दर्शन

नव्या जगाचे दर्शन

googlenewsNext

विपश्यना विद्येचा अभ्यास करताना एक वेळ असा भ्रम अवश्य झाला, की मी कोणत्या कल्पना लोकांत तर भ्रमण करत नाही ना़ ही कल्पना नाही, सत्य आहे, हे तपासण्यासाठी विपश्यनाचार्य सयाजी उ बा खिन यांनी एक दोन उपाय सांगितले़ त्यांना पारखून जाणले की खरोखरच ही कोणती कल्पना नाही़ आत्मसंमोहन नाही़ हे आतील सत्य आहे़ वर-वर अविद्येचे मोठमोठे आवरण आहे़ ते असल्यामुळे आम्ही सत्याचा साक्षात्कार करू शकत नाही, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांनी नमूद केले़ भगवान बुद्धाच्या या कल्याणी विद्येच्या योग्य प्रयोगाने हे वरचे आवरण तुटले आणि आतील एका नव्या जगाचे दर्शन झाले़ ठीक तशाच प्रकारे की जसे अंड्यात राहणारे पक्ष्याचे पिल्लू बाहेरच्या जगाबद्दल काय जाणणार? जेव्हा अंडे फुटते आणि ते बाहेर येते तेव्हा नवे जग पाहून आश्चर्यचकीत होते़ आत अंधारात राहत असताना कल्पनाही करू शकत नाही की बाहेरचे सत्य कसे आहे़ अगदीच वेगळे, दोघांचा काही ताळमेळ नाही़


ठीक असेच होते जेव्हा अविद्येचे आवरण तुटल्यामुळे नेहमी बर्हिमुखी राहणारी व्यक्ती आपल्या आतील सत्य पाहू लागते़ त्या सत्याचा अनुभव करू लागते़ तेव्हा जाणतो की बाहेरच्या स्थूल सत्याकडून हे सत्य वेगळेच आहे़ आपल्या परंपरागत मान्यतेनुसार यज्ञोपवीत धारण न करण्याने आतापर्यंत मी शुद्र होतो़ जोपर्यंत आमचा समाज सर्व लोकांना यज्ञोपवीत धारण करण्याची परवानगी देणार नाही, तोपर्यंत मी यज्ञोपवीत धारण करणार नाही़ या संकल्पामुळे आतापर्यंत शुद्र राहणे मला प्रिय होते; परंतु आता मला वाटते की खऱ्या अर्थाने मी द्विज झालो़ यज्ञोपवीत धारण करण्याचे कर्मकांड पूर्ण करून कोणी कसे द्विज होतो बरे? येथे अविद्येच्या अंड्याचे आवरण तोडून माझा नवा जन्म झाला़ मी खरोखर द्विज झालो़ माझे कल्याण झाले़ परमकल्याण झाले, असे विपश्यनाचार्य गोएंका सांगतात़


फरेदुन भुजवाला

Web Title: Visions of the New World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.