आनंद तरंग; प्रकटे आत्माराम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:55 AM2019-07-25T03:55:50+5:302019-07-25T03:56:16+5:30

मोठा काही नाट्यमय प्रसंग घडला असेल, तर केवढं रामायण घडलं, असं म्हणतो. एवढं रामायण ऐकलं, तरी प्रश्न काय तर म्हणे रामाची सीता कोण? असं आपण सहजपणे म्हणतो

Wave of happiness; Appearance Atmaram | आनंद तरंग; प्रकटे आत्माराम

आनंद तरंग; प्रकटे आत्माराम

Next

शैलजा शेवडे

‘प्रभू श्रीराम’ प्रत्येक भारतीयाच्या तनामनात व्यापून राहिलाय. ‘राम’ शब्द असलेले किती वाक्प्रचार, शब्दसमूह आपण सहजपणे वापरतो. आपण एकमेकांना भेटलो की, ‘राम राम’ म्हणतो. सकाळच्या पहिल्या, प्रसन्न प्रहराला आपण ‘राम प्रहर’ म्हणतो. भरपूर कामे असतील, तर ‘रामरगाडा’ म्हणतो. एखाद्या गोष्टीत काही अर्थ राहिला नसेल, तर ‘त्यात काही राम नाही’ असं म्हणतो. व्यक्ती मृत पावली, तर त्या व्यक्तीने ‘राम म्हणलं’ असं म्हणतो. खारीच्या पाठीवरच्या पट्ट्यांना आपण ‘रामाची बोटं’ म्हणतो. मुंगूस दिसला आणि आपण त्याला ‘रामाची शपथ’ घातली, तर तो आपल्याला तोंड दाखवतो, अशी आपली श्रद्धा असते. एखाद्या गोष्टीला बाकी कुणी साक्षीदार नसला, तरी ‘राम’ सर्वसाक्षी आहे, त्याला माहीत आहे, या भावनेने ‘राम जाणे’ असं सहजपणे म्हणतो. ‘हे राम’ हा आपला सहजोद्गार असतो. हिंदीत ‘रामभरोसे’ हा शब्द वापरतात. कधी आपण ‘रामा शिवा गोविंदा’ म्हणतो. मोठा काही नाट्यमय प्रसंग घडला असेल, तर केवढं रामायण घडलं, असं म्हणतो. एवढं रामायण ऐकलं, तरी प्रश्न काय तर म्हणे रामाची सीता कोण? असं आपण सहजपणे म्हणतो. कष्टाचे दिवस जाऊन सुखाचे दिवस आले की, वनवास संपला म्हणतो. भावंडांमध्ये प्रेम असेल, तर राम-लक्ष्मणाची जोडी असा उल्लेख करतो. राज्यकारभार उत्तम आणि जनहितार्थ असेल, तर त्याचा उल्लेख आपण ‘रामराज्य’ असा करतो. एखाद्या रोगावर नेमकं एखादं औषध अतिशय गुणकारी ठरलं, तो आजार निघून गेला, तर आपण ‘रामबाण’ औषध म्हणतो..
रामाची कथा अत्यंत पतितपावन आहे...
राम आपल्या अंतर्यामी आहे...
घटाघटात, कणाकणात राम विराजित आहे...
राम हृदयातला हुंकार आहे...
राम एक नाद आहे...

Web Title: Wave of happiness; Appearance Atmaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.