मंदिरात प्रवेश घेण्याआधी घंटी का वाजवली जाते?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 01:30 PM2018-04-02T13:30:23+5:302018-04-02T13:30:23+5:30

मंदिर घरातील असो वा धार्मिक स्थळावरील तिथे घंटी असतेच.

What is the bell sounded before entering the temple? | मंदिरात प्रवेश घेण्याआधी घंटी का वाजवली जाते?

मंदिरात प्रवेश घेण्याआधी घंटी का वाजवली जाते?

Next

असे म्हणतात की, पूजा करताना घंटी वाजवली पाहिजे. कारण घंटी वाजवल्याने देव जागा होतो आणि भक्तांची प्रार्थना ऐकतो. पण याचं इतकंच एक कारण नाहीये. याला काही सायंटिफीक कारण असल्याचीही माहिती आहे. त्याकारणामुळेच घंटी नेहमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावली जाते. 

वैज्ञानिक कारण

मंदिर घरातील असो वा धार्मिक स्थळावरील तिथे घंटी असतेच. यामागे धार्मिक कारण तर आहेच सोबतच यांचं वैज्ञानिक कारणही आहे. अभ्यासकांचं म्हणनं आहे की, जेव्हा घंटी वाजवली जाते तेव्हा वातावरणात एक कंपन निर्माण होतं. हे कंपन जवळपास पुढील 10 सेकंदासाठी ऐकायला मिळतं. 

या कंपनाच्या आवाजामुळे तुमच्या शरीरातील काही इंद्रिय जागी होतात. तसेच या आवाजामुळे तुमच्या डोक्यातील नकारात्मक विचार दूर होतात. यामुळे तुम्ही अधिक लक्ष केंद्रीत करुन स्वच्छ मनाने मंदिरात प्रवेश मिळवता. 

यासोबतच घंटीच्या आवाजामुळे आजूबाजूचे जिवाणू, विषाणू आणि सूक्ष्म जीव दूर होतात. याने वातावरण शुद्ध राहतं. हेच कारण सांगितलं जातं की, ज्या जागांवर नियमीत घंटीचा आवाज येत राहतो तेथील वातावरण पवित्र राहतं. 

घंटीच्या मनमोहक आवाजात व्यक्तीला आध्यात्माकडे आढून नेण्याची क्षमता आहे. मन घंटीच्या आवाजाशी एकरुप होऊन शांततेचा अनुभव घेतं. डोक्यातील नकारात्मक विचार दूर होऊन भक्त आणखी एकाग्रतेने भक्ती करु शकतात.
 

Web Title: What is the bell sounded before entering the temple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.