स्वप्नात सर्दी, खोकला अन् ताप आल्याचं दिसत असेल तर घाबरू नका, असू शकतात 'हे' संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:15 PM2020-04-06T16:15:38+5:302020-04-06T16:16:31+5:30
स्वप्नात ताप आल्याचं दिसणे, बेडवर झोपलेलं दिसणे, रोगातून मुक्त होणे. या गोष्टींचा वेगवेगळा अर्थ असतो.
झोपेत स्वप्न बघणं ही एक सामान्य क्रिया आहे. स्वप्न शास्त्रानुसार, अनेकदा स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या घटनांचे देखील संकेत असतात. स्वप्नात ताप आल्याचं दिसणे, बेडवर झोपलेलं दिसणे, रोगातून मुक्त होणे. या गोष्टींचा वेगवेगळा अर्थ असतो.
आजूबाजूच्या लोकांपासून रहा सावध
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात जर तुम्ही एखाद्या आजाराने वेदनेत असाल तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही आयुष्यात कोणत्या तरी गोष्टीचं ओझं घेऊन जगत आहात. याबाबत आई-वडिलांना किंवा जवळच्या व्यक्तीला सांगा. जेणेकरून तुम्हाला हलकं वाटेल आणि जीवनात पुढे जाऊ शकाल. जर स्वप्नात तुम्ही एखाद्या जखमेमुळे आजारी असाल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.
आर्थिक समस्या होईल दूर
जेव्हा तुम्ही स्वप्नात बघता की, तुम्ही एका आजारातून वाचले आहात. तर हा संकेत असतो की, तुम्ही भविष्यात करणाऱ्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. स्वप्नशास्त्रानुसार, तुम्ही मेहनत करत गेला तर यश तुमच्या आजूबाजूला राहील आणि जीवन आनंदी राहील.
हळूहळू समस्या दूर होतील
स्वप्नशास्त्रानुसार, तुम्ही जर स्वप्नात तुम्हाला अजिबात उपचार नसलेला आजार झालेला बघत असाल तर हा संकेत असू शकतो की, तुम्ही भविष्यात एका न सोडवता येणाऱ्या अडचणीत सापडणार आहात. या स्पप्नानंतर स्वत:ला शांत ठेवा आणि योगा करा. हळूहळू ही समस्या दूर होईल.
वाईट सोडून पुढे जाण्यास तयार
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात जर तुम्ही आजारामुळे स्वत:ला मृत बघत असाल तर चिंता करण्याची गरज नाही. हा संकेत असू शकतो की, तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्याय सुरू करणार असाल आणि जुन्या गोष्टींना सोडणार असाल. हा इशारा असू शकतो की, तुम्ही वाईट सगळं सोडून पुढे जाण्यास तयार आहात.
मित्रांपासून सावध राहण्याची गरज
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात जर तुम्ही उलटी करताना दिसत असाल तर याचा अर्थ असा होतो की, भविष्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीकडून दिलासा मिळणार आहे. कर्जाची समस्याही संपू शकते. पण अशात मित्रांकडून सावध रहा.
चांगलं काहीतरी होणार असेल...
स्वप्नात जर तुम्हाला ताप, सर्दी खोकला झालेला दिसत असेल तर हा तुमच्यासाठी शुभ संकेत मानला जातो. असे मानले जाते की, याचा अर्थ तुम्हाला व्यापारात फायदा होणार आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर चांगलं प्रमोशन होणार असेल.