वास्तुशास्त्र म्हणजे काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 02:41 PM2018-01-03T14:41:49+5:302018-01-03T14:42:45+5:30
निसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधावेयाचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र. पुर्वी माणुस जंगलात ,शेतामध्ये , डोंगरात रहायचा म्हणजे निसर्गाच्या जवळ राहायचा ऊन , वारा , पाऊस , मोकळी हवा या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक त्या मिळायचा त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहायचे .
- मकरंद सरदेशमुख
निसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधावेयाचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र. पुर्वी माणुस जंगलात ,शेतामध्ये , डोंगरात रहायचा म्हणजे निसर्गाच्या जवळ राहायचा ऊन , वारा , पाऊस , मोकळी हवा या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक त्या मिळायचा त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहायचे . मेडिकल प्रॉब्लेम कमी असायचे गावाकडील कोणता ही शेतकरी पहा त्याचे आरोग्य शहरातील माणसापेक्षा नक्कीच चांगले असते कारण शेतकरी शेतामध्ये दिवसातील १२ तास हवेत उजेडामध्ये , उन्हामध्ये राहुन काम करतो आणि शहरातील माणुस १२ तास बंदिस्त रूममध्ये बसुन काम करतो .शरीराला आवश्यक हवा , उजेड , सुर्यप्रकाश मिळतच नाही त्यामुळे आरोग्याच्या समस्याया वाढत आहेत येणारी पुढची पिढी आपले वंशज हे चार भिंतीचा आत स्वतःला बांधून घेणार हे पूर्वीचा काळातील ऋषी मुनी यांना माहित होते त्यामुळे त्यांनी निसर्गनियमानुसार घर कसे बांधता येईल याचा शास्त्रोक्त अभ्यास करून मयमुनी मयासुर व विश्वकर्मा यांनी भारतीय वास्तुशास्त्राची ग्रंथरचना केली आणि वेदिक पद्धतीने बांधकाम कसे करता येईल याची शास्त्रोक्त माहिती मयमतम व विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथामध्ये दिली आहे .
२) वास्तुशास्त्राचे फायदे
१) वास्तुशास्त्रानुसार घर असल्याने माणुस जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ रहातो.
२) पृथ्वीचा मॅग्नाटिक फिल्ड नुसार उत्तरेला पाय करून झोपल्याने आरोग्य सुधारते .
३) आग्नेयेला किचन असल्याने स्वयंपाक रुचकर , स्वादिष्ट , पौष्टिक होतो त्यामुळे चांगले अन्न तयार होते व शरीर सुदृढ होते .
४) घर वास्तुनुसार असेल तर शिक्षण , आरोग्य , व्यवसायत भर -भराट उत्तम राहते.
५) शुभऊर्जा घरामध्ये संतुलित राहिल्याने आनंददायी वातावरण कायम राहते व घरातील सगळ्यांची मानसिक , शारिरीक , अध्यात्मिक प्रगती होते .
६) मुलांची शारिरीक , बौद्धिक , मानसिक , शैक्षणिक प्रगती चांगली होते .
७) नव नवीन कल्पना आयुष्यात सुचतात व व्यवसायात प्रगतीमध्ये चांगली वाढ होते व आर्थिक आवक चांगली राहते .
८) वास्तुनूसार घर असेल तर नातेवाईक संबंध व शेजारील मित्र यांच्याशी सलोख्याचे प्रेमळ संबंध राहतात .
९) बांधकामाचे नियम शास्त्रोक्त पद्धतीचे असल्यामुळे केलेल बांधकाम कायम स्वरूपी टिकुन राहते .
१०) पाणी , अग्नी , वायु , पृथ्वी व आकाश या पंचतत्वांचा एकत्रीत संतुलनामुळे वास्तुमध्ये शुभ ऊर्जा कायम टिकुन राहते व घरातील सर्वांचा सर्वांगीण प्रगती चांगली होते .
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)