येथेचिया कथावार्ता किजेति
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 06:12 AM2020-04-10T06:12:02+5:302020-04-10T06:12:12+5:30
माणूस हा कथाप्रिय होता.नातवांना गोष्टी सांगायची जबाबदारी आजी व आजोबावर असायची आटपाट एक नगर होतं, हेच प्रत्येक गोष्टीचं प्रास्ताविक होतं.
पूर्वी विरंगुळा नव्हता पाहाण्यासाठी नाटक,सेनिमा नव्हते,कादंब-या वाचायला शिक्षण नव्हतं.पण कथा ऐकायला कान होते.कथेचे ग्रंथ होते.काही कल्पक गोष्टी सांगण्यात चतुर असायचे एकच गोष्ट रात्रभर सांगणारे माणसं असायचे.कीर्तनकार प्रबोधन करीत असत.महाभारत रामायण,जाताककथा, इसाफनीती, पंचतंत्र याचा ब-यापैकी प्रचार झाला होता.विष्णुशमार्ने कथा सांगूनच तीन मूर्ख राजपुत्रांना शाहाणं केलं होतं. माणसांना शाहाणपण देण्याचं काम कथेने केलं होतं हे मान्य करावं लागेल.
माणूस हा कथाप्रिय होता.नातवांना गोष्टी सांगायची जबाबदारी आजी व आजोबावर असायची आटपाट एक नगर होतं, हेच प्रत्येक गोष्टीचं प्रास्ताविक होतं. कथाकार माणसाच्या रेखाचित्रात नाना प्रकारचे रंग भरत होता.कथा फुलत होती, श्रोते डुलत होती. भूतकाळातल्या कथानकातील दोष टाळायचे असतात गुण पाळायचे असतात. सिद्धांताचा अर्थ कळावा म्हणून कथेतून हितोपदेश केल्या जात होता. कथा प्रत्येकाला असते म्हणून कथा आवडत होती.आपणही स्वत:च्या कथेचे पात्र असतो.समान गुणधमार्चा वेध असतो. बालकथा, नीतीकथा, बोधकथा,भयकथा, परिकथा, रहस्यकथा असा अनंत कथेचा खजाना कथा या दोनच अक्षरात सामावलेला आहे.रामकथेने चारित्र्य दिलं, कृष्णकथेने सामर्थ्ये दिलं,धर्मकथेने सत्य सांगितलं ,कथेने गुणांचा विकास व दोषांचा ºहास होतो. कथेत रमत असतो. भगवंत म्हणतात,
‘मच्चित्ता मद्गता प्राणा बोधयंत परस्पर
कथयंतस्य मांनित्यं तुष्यंतिच रमन्तिच’
श्रीचक्रधर हे मराठीतले पहिले कथाकार आहेत.सिद्धांत सुलभ करण्यासाठी त्यांनी अनेक दृष्टांत सांगितले आहेत.सामान्य बुद्धीच्या माणसाला दृष्टांतामुळे सिद्धांत कळतो.कथा सांगण्यातून,वार्ता वर्तनातून आपल्या समोर येते.फक्त कथनात व वर्तमान पत्रात वास्तव असावं लागतं.पुराणातली चुकीची कथा स्वामी दुरुस्त करुन सांगत असतं.आमनदेवाचे डोळे काढले रामदेव देवगिरीचा राजा झाला ही वार्ता स्वामी भक्तांना सांगतात."सावधेया असावे"अशी सूचना करुन भक्तांना सजगतेचा सल्ला देतात.
कथा संतुष्ट करणारी असावी.संतुष्ट माणसात सकारात्मक ऊर्जा वाढते.मन रममान होतं.चांगल्या कथा व वार्ता सांगणारा व ऐकणारा आनंदात वावरत असतो.कथा व वार्ता दुधारी असतात.एक गुणावर्धक एक दोषर्धक असते. दौर्बल्य निर्माण करणा-या कथा सांगून हतोत्साही करते ती कथा सांगुनये व ऐकूहीनये.
‘रात्री परावर कथा कथिता उजैडे
तै विस्मिते मुनीवरे पुसिजे प्रभूते
सामर्थ्यवेधकमहा निजदर्शनाचे
सांगे सुवेधपती राजकथा प्रसंगे’
स्वामी रात्रभर कथा सांगत असतं.त्यात ऐहिक व पारलौकिकता असायची, कथेत सामर्थ्ये व वेधकता होती.राजकथा म्हणजे कथेतून रहस्य सांगितल्या जात होतं.आजही आपण विज्ञान कथा ऐकतो त्या ज्ञानवर्धक व रहस्य उलगडणा-या असतात.डा.बाबासाहेब म्हणाले एक शाहीरी गाण्यात माज्या दाहा भाषणाची ताकद असते,शिवरायांचं व्यक्तिमत्व शाहीरांनी कथेतूनच लोकांपर्यांत नेलं आहे.
रामकथा, कृष्णकथा हाजारो वषार्पासून आम्ही ऐकतो.आजही त्या नित्यनूतन वाटतात.मनाला ताजं करतात.बळ देतात.कथा व्यथा हरण करते.माथा माजबूत करते.उगीचच वायफळ गप्पा मारण्या ऐवजी संसर्गजन्य विषाणू पासूनस्वतंला वाचविण्यासाठी घरात बसून महापुरुषांच्या व ईश्वराच्या कथा वाचने काय वाईट आहे.पांडवांच्या एक वर्ष अज्ञातवासातली कथा कळली तर, काही दिवस आपण घरातच राहाण्याची शक्ती मिळते.
बा. भो. शास्त्री