जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्रता विनित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 01:13 PM2019-04-08T13:13:08+5:302019-04-08T13:17:45+5:30

महापुराच्या विरोधात उभे राहणारे वृक्ष उन्मळून पडतात. याउलट नदीपत्रातील लव्हाळ्याची पाती सकाळच्या वेळी सुर्यकिरणांनी न्हाऊन निघतात.

In whose mind wisdom is awakened - yes humility is solved | जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्रता विनित

जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्रता विनित

Next

- दत्ता कोहिनकर- 
    सकाळच्या रम्य प्रहरी केंद्रात फिरत असताना आचार्य सत्यनारायण गोएंकाजींचा एक दोहा कानावर पडला, जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्रता विनित। जिस डाली को फल लगे-  झुकने की ही रीत॥ 
    मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी-चार्ली चॅप्लिनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्नीलला विचारले.आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पाहायची आहे का? चॅिप्लनन उत्तर दिलं कि त्याच घर खूपच लहान असून प्रार्थना करणार कोठे? गांधीजी म्हणाले तुम्ही सोफ्यावर बसा, आम्ही खाली बसून प्रार्थना करू. त्याचप्रमाणे त्यांनी केल सुद्धा. पुढे चॅप्लिनन लिहिलंय, गांधीजी व त्यांच्या साथीदारांना माज्या पुढेच जमिनीवर बसण्याची लाज बिलकुल वाटली नाही पण मी मात्र त्यांच्यापुढे वर सोफ्यावर बसून खाली पाहताना खजिल झालो होतो. खरोखर मित्रांनो आयुष्यात महत्त्कार्य करताना विनम्रता ह्या गुणाचा विकास करावा लागतो. अहंकाराचा त्याग करावा लागतो. सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. मृत्यूपत्राच्या माध्यमातून सिकंदरने आपल्या सर्वांना एक संदेश दिला होता, मी सिंकदर मी जग जिंकले पण खाली हाताने आलो होतो आणि खाली हातानेच परत चाललोय. म्हणून कितीही पैसा, प्रतिष्ठा, सत्ता मिळवली तरी वृथा अभिमान बाळगु नका, नेहमी न रहा. 
म्हणतात ना महापुरे झाडे जाती-तेथे लव्हाळे वाचती. महापुराच्या विरोधात उभे राहणारे वृक्ष उन्मळून पडतात. याउलट नदीपत्रातील लव्हाळ्याची पाती सकाळच्या वेळी सुर्यकिरणांनी न्हाऊन निघतात. विनयशीलतेचे महिमान सांगताना बसवेश्वर विचारतात. गाय आपल्या पाठीवर बसणाऱ्यांना कधी दूध देईल का? ज्याला दुध हवे त्याने गाईच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे.ज्याला दुध हवे त्याने गाईच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे.बहिणाबाई चौधरीच्या काही स्फुट ओव्या आहेत. एका ओवीत बाभळीचे पान केळीच्या पानाशी बोलते. 
फाट आता टराटरा-नाही दया तुफानाला।
हाले बाभळीचे पान - बोले केळीच्या पानाला॥ बाभळीचे पान तसे अगदी लहान, केळीचे पान तुलनेने महान सोसायट्याच्या वाराला केळीचे पान अडवू पाहते व आपला उर फोडून घेते. बाभळीचे पान वाºयाला कौतुकाने कुरवाळते त्यामुळे वारा त्या लहानग्याला खांद्यावर घेऊन नाचतो. संत तुकाराम महाराज पण म्हणतात ना - लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा । हे लहानपण म्हणजे आपले अवमुल्यन नव्हे - तर हे असते सभ्यतेचे सार. सभ्यतेमुळे माणूस संयमी व शांत होतो..  

Web Title: In whose mind wisdom is awakened - yes humility is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.