तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 08:01 PM2020-03-14T20:01:15+5:302020-03-14T20:02:02+5:30

"किसी चीज को अगर दिलसे चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने मे जुड जाती है... "

You are the creator of your life.... | तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार...

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार...

googlenewsNext

डॉ.दत्ता कोहिनकर - 
मानवी मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन व दुसरे अंर्तमन.बाह्यमन दहा टक्के तर अंतर्मन ९० टक्के पॉवरफुल असते.
     बाह्यमनाने अंतर्मनाला दिलेली सुचना किवा विचार प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी अंतर्मन प्रयत्नांची पराकाष्ठा करते.  व जगातील सर्व प्राण्यांची अंतर्मन एकमेकांना जोडलेली असतात. म्हणून "या हृदयीचे त्या हृदयी" असे म्हणतात . थोड अधिक विस्ताराने अंतर्मन समजून घेण्यासाठी डॉ.उज्जवल उके 
व सुनील पारेख म्हणतात, बाह्यमनाला आपण तात्पुरते राम म्हणू या व अंर्तमनाला हनुमान. रामाने हनुमानाला जे सांगितले ते प्रत्यक्षात आणण्यासाठी हनुमान पूर्णतः ताकद वापरतो.व आपल्या सगळ्यांचे हनुमान म्हणजेच ( अंतर्मन) एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणून संपूर्ण विश्वात हनुमान झ्र वानरसेना गुगल नेटवर्क आहे.

 मित्रांनो, जो विचार तुम्ही अंर्तमनाला देताल तशी स्थिती, व्यक्ती, ते तुमच्या आयुष्यात आणते. 
    भयाचा विचार भयभीत स्थितीला आकर्षित करेल. *भगवान बुद्ध म्हणतात ह्लजसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही  व्हाल...तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्व विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल*.
    आपण जसा विचार करतो त्या प्रकारची तरंग आपण आपल्या आयुष्यात खेचत असतो. सगळ्या प्रकारची तरंग वातावरणात आहेत. तुम्ही ज्या चॅनलचे बटन दाबता तोच ट्यूनअप होऊन प्रक्षेपित होतो. रेडिओची सुई जेथे मॅच होईल तीच धुन चालू होईल. म्हणून तुम्ही जो अँटेना लावाल.त्याच प्रकारची तरंग तुम्ही तुमच्याकडे आकर्षित कल 
    *तुम्ही जसा विचार कराल त्याच प्रकारची तरंग अर्थात स्थिती, व्यक्ती, संधी आकर्षित कराल. शब्द व विचार हे जग आहे*. म्हणून सकारात्मक विचार  करा.एकाच वेळेला अनेक जणांनी प्रार्थना केल्यावर भले ते दूर असोत. सिद्धांतानुसार ती फलदायी होते.
    म्हणतात ना "किसी चीज को अगर दिलसे चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने मे जुड जाती है" क म्हणून निर्भय होऊन करोना व्हायरस पंचतत्वात विलीन होऊन नष्ट झाला आहे. आम्ही सर्व जन सुखी , निरोगी, आनंदी आहोत. सारे प्राणी सुखी  आहेत. सर्वांच कल्याण होत आहे. अशी प्रार्थना वारंवार करा. डोळे बंद करून सर्व जग सुखी आहे. तुम्ही व तुमचे कुटुंब आनंदी व सुखी आहे असे भावना सहित चलचित्र पुन्हा पुन्हा बघा. व सर्वांना संकटमुक्त केल्याबद्दल त्या वैश्विक शक्तीचे वारंवार आभार माना. याला *कृतज्ञतेची* साधना म्हणतात. 
 

Web Title: You are the creator of your life....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.