चित्त शुध्दीसाठी थोडा वेळ अवश्य दया पण कर्मात लुप्त व्हा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 08:33 PM2019-03-31T20:33:28+5:302019-03-31T20:42:47+5:30

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो...

you need work at the same time of meditation | चित्त शुध्दीसाठी थोडा वेळ अवश्य दया पण कर्मात लुप्त व्हा... 

चित्त शुध्दीसाठी थोडा वेळ अवश्य दया पण कर्मात लुप्त व्हा... 

Next

- डॉ. दत्ता कोहिनकर - 
भैरवनाथाच्या मंदिराच्या मैदानावर हरिनाम सप्ताह चालू झाला. सलग सातही दिवस महादू न चुकता प्रवचनाला हजेरी लावायचा. महादूची आर्थिक परिस्थिती जरा बिकटच होती. पत्नीच्या व त्याच्या स्वभावात दोन टोकाचे अंतर त्यामुळे घरात रोजच भांडणे, अस्वस्थता, व्याकुळता याला महादू वैतागला होता. सलग सात दिवस का होईना या त्रासातून थोडं बाहेर पडावं म्हणून महादूने मनापासून या सत्संगाचा लाभ घेतला व त्यातील एका महाराजांकडून माळ घालून दीक्षा घेतली. महाराजांच्या शिकवणीनुसार मनुष्यजन्माचा प्रमुख उद्देश देवाची प्राप्ती करणे, मोक्ष मिळवणे हाच असल्याचे महादूच्या मनात पूर्णत: बिंबले. महादू घरातील त्रासाला कंटाळून, शांतता मिळविण्यासाठी सारखंच महाराजांकडे जाऊ लागला. महाराजांनी त्याला एक गुरूमंत्र दिला. हा मंत्र महादू सतत म्हणू लागला. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो. वारंवार एकाच मंत्राचे उच्चारण, त्यातून निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा यामुळे महादूच्या शरीरावर व मनावर दुष्परिणाम जाणवू लागला. महादूला नैराश्य आले. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी महादू सारखं देवळात जाऊन ध्यान करू लागला. 
घरात बायकोवर पडलेल्या जास्त जबाबदारीने ती हैराण झाली. - तिने महादूबरोबर जोरदार भांडणे केली व ती माहेरी निघून गेली. महादूने मात्र यातून पळ काढण्यासाठी महाराजांच्या आश्रमात वास्तव्य केले व पूर्णवेळ तो महाराजांच्या सेवेत घालवू लागला. यामुळे बायको-मुलांचे खूप हाल झाले. घरातील लोक रस्त्यावर आली. महादू मात्र आश्रमात राहून देवळात ध्यान करत बसला आहे. महादूने महाराजांच्या आश्रमातील सुरक्षित जागी स्वत:ला बंदिस्त करून घेतले आहे.
महादूची ही कहाणी ऐकून मला एका माणसाने सांगितलेली गोष्ट आठवली. सर्कशीतील पिंजऱ्यातला एक सिंह पिंज?र्यातून बाहेर आला. ते पाहून तेथील व्यक्ती जीवाच्या भीतीने मिळेल त्या दिशेला पूर्ण ताकदीनिशी पळू लागल्या. एक महाराज मात्र न डगमगता शांतपणे सिंहाच्या पिंजऱ्यात जाऊन आत कडी लावून बसला. त्याला माहीत होते सिंहाला ओढून आणले तरी तो पिंजऱ्यात येणार नाही. बाहेर सर्वत्र धोका व भय आहे. पिंजऱ्यात मात्र नाही. महाराजांनी सुरक्षित जागेमध्ये (कम्फर्ट झोन) प्रवेश केला आणि ते निर्धास्त झाले. मग त्यांचे बरेचसे शिष्य देखील संसारातून पळून पिंजऱ्यात जाऊन बंदिस्त होतात. तेथे सुरक्षित जागी कुठलाही सिंह येत नसतो. आज अनेक महाराजांचे शिष्य देखील जीवनकह्यांती न करता पलायन करून पिंजत बंदिस्त होत आहेत. 
स्वामी विवेकानंद म्हणतात, तासनतास मंदिरात घंटा वाजवत बसणा?र्या मुलांची मला फार भिती वाटते. त्यापेक्षा मैदानावर जाऊन फुटबॉल खेळून आपली शरीरयष्टी कमावणारा ईश्वराच्या निकट लवकर पोहचू शकतो. देवळात अवश्य जा. तेथील सकारात्मक उजेर्चा आपल्यावर खुप चांगला परिणाम होतो पण घरातील आई-वडिल, पत्नी-मुले यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. विवेकानंद म्हणत ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातील देव काय कळणार ? म्हणून जीवभावे शिव सेवा  करा. 
 अध्यात्म म्हणजे कुणाच्याही अध्यात - मध्यात न पडता स्वार्थी बनणे नसून जे का रंजले-गंजले-त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा - देव तेथेचि जाणावा यात सामावले आहे. 
संत ज्ञानेश्वर माऊली देखील म्हणतात ना, जे - जे भेटे भूत - ते - ते मानावे भगवंत - म्हणून प्रत्येकात देव पहा. मेल्यानंतर स्वर्ग मिळेल, तेथे खूप सुख असते. तो स्वर्ग मिळवण्यासाठी तासनतास पिंजऱ्यात न अडकता या पृथ्वीतलावरच स्वर्ग निर्माण करा. आपल्यातील विधायक शक्ती राष्ट्रनिर्मितीसाठी वापरा. 
स्वामीजी म्हणत आता अन्य देवदेवतांची पूजा कशाला ? राष्ट्र हेच माझै दैवत -राष्ट्रपूजा हीच देवपूजा - होय. म्हणून कर्मयोग करा - शेतात काम करून देवाला प्राप्त करणारे संत सावतामाळी देखील म्हणायचे कांदा-मुळा, भाजी - अवघी विठाई  मुक्तीसाठी मनाच्या निर्मलतेची गरज आहे. भस्म, माळा, जटा, भगवी कपडे ही दुय्यम आहेत. बुद्ध म्हणतात जटा-जूट माला तिलक-हुआ सिर को भार । वेष बदलकर क्या मिला - अपना चित्त सुधार ।चित्त शुध्दीसाठी थोडा वेळ  अवश्य दया पण कर्मात लुप्त व्हा. मोठमोठी मंदिरे - सुमार साधु महाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  मंदिरात - मठात अवश्य जा पण लक्षात असू द्या - 
शोधिशी मानवा - रावळी मंदिरी-नांदतो देव हा आपल्या अंतरी त्या मंदिरातील देवाचे -सत्वगुण आपल्या अंगी उतरवण्यासाठी प्रयत्न करा. अंधश्रध्देला मूठमाती द्या - समर्थ रामाला प्रार्थना करतात, बुद्धी दे रघुनायका. महादूला भेटून त्याचा बुद्धीभेद केला व त्यास समजावून सांगितले. आज सत्य ही शिव आहे व शिव ही सुंदर आहे. हे त्यास उमगले आहे. महादू कर्मयोगी झाला असून त्याचे कुटूंब आज परत एकत्र आले व ते आज सुखी आहे. प्रपंच करावा नेटका हे त्यास उमगले आहे.

Web Title: you need work at the same time of meditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.