जेऊर सोसायटीत १ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार : २८ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 05:39 PM2018-10-10T17:39:08+5:302018-10-10T17:40:07+5:30
नगर तालुक्यातील जेऊर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये १ कोटी १८ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार आढळून आल्याने सचिवांसह संस्थेच्या आजी- माजी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये १ कोटी १८ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार आढळून आल्याने सचिवांसह संस्थेच्या आजी- माजी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर रकमेचा भरणा न केल्याचे लेखा परिक्षणामध्ये आढळून आले. लेखा परिक्षक प्रकाश शिवाजी गडाख यांच्या फिर्यादी वरून अजय बाळासाहेब पटारे, मारुती सिताराम तोडमल, सुभद्रा पोपट म्हस्के, रंगनाथ शंकर बनकर, रामचंद्र चिमाजी धनवडे, दत्तात्रय शंकर मगर, विश्वनाथ मल्हारी शिंदे, साहेबराव अनिलराव वाघ, भरत अनुश्री तोडमल, लक्ष्मण गजाराम तोड मल, दिलीप एकनाथ ससे, ताराबाई मगर, विजय आनंदा पाटोळे, शिवाजी संतू तवले, मच्छिंद्र एकनाथ ससे, बाबासाहेब निवृत्ती शिंदे, अनिल ज्ञानदेव तोडमल, पांडुरंग सोपान तवले, अंबादास म्हस्के, ज्ञानदेव तुकाराम गोरे, बालाजी मनोहर पाटोळे, सुनिता पोपट घुगरकर, अरुण भानूदास तोडमल, चिमाजी पांडुरंग धनवडे, एन.एल धनवळे, ए.सी पाटोळे, टि.जे सिनारे, आर.जे मनतोडे आदी २८ जणाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विनोद चव्हाण करत आहे.
भरणा न करता लंपास
जेऊर सोसायटीच्या कर्जदार सभासदांचे कर्जाच्या हप्ते पोटी भरणा केलेली रक्क १ कोटी १८ लाख ५४ हजार १४५ रुपये सचिवांनी बँकेत न भरता सदर रक्केचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास
गत वषार्पासून जेऊर सोसायटीत गैरव्यवहाराच्या मुद्यावरुन गाजत आहे. दरम्यान उपनिबंधक यांनी चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सदर प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.