गुंडेगावात १ कोटी ३५ लाखांच्या पाणलोटाच्या कामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:21 AM2021-05-11T04:21:23+5:302021-05-11T04:21:23+5:30
केेडगाव : गतिमान पाणलोट विकास अभियान व वनक्षेत्रात जलसंधारण वाढीसाठी गुंडेगाव गावासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा ...
केेडगाव : गतिमान पाणलोट विकास अभियान व वनक्षेत्रात जलसंधारण वाढीसाठी गुंडेगाव गावासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गावातील ८०६ हेक्टर क्षेत्र पाणलोटाखाली येणार असल्याची माहिती गुंडेगावचे सरपंच मंगल सकट व उपसरपंच संतोष भापकर यांनी यांनी दिली. ज्येष्ठ सदस्य नानासाहेब हराळ, संतोष धावडे, भाऊसाहेब हराळ यांनी समाधान व्यक्त केले.
नुकताच या कामांचा प्रारंभ गुंडेगावचे सरपंच सकट यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ व गुंडेगावचे उपसरपंच संतोष भापकर, तालुका कृषी अधिकारी कारंडे, कृषी सहाय्यक टकले, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब हराळ, भाऊसाहेब हराळ, संतोष धावडे, संजय कोतकर, सुनील भापकर, संदीप जाधव, राहुल चौधरी, मेजर सतीश चौधरी, संतोष सकट, संजय भापकर, रामकृष्ण कुताळ, अब्बास शेख, दिलीप धावडे, एकनाथ कासार व शेतकरी उपस्थित होते.