अकोले तालुक्यात १ हजार १५३ रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:03+5:302021-01-01T04:15:03+5:30

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर यांच्या मोग्रस गावाने बिनविरोधची ६० वर्षांची परंपरा कायम राखली असून सेनेचे प्रदीप हासे यांची ...

In 1 thousand 153 arenas in Akole taluka | अकोले तालुक्यात १ हजार १५३ रिंगणात

अकोले तालुक्यात १ हजार १५३ रिंगणात

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर यांच्या मोग्रस गावाने बिनविरोधची ६० वर्षांची परंपरा कायम राखली असून सेनेचे प्रदीप हासे यांची २५ वर्षे सत्ता असलेले म्हाळादेवी, राष्ट्रवादीचे विनोद हांडे यांचे शेरणखेल, निळवंडे गावांत प्रत्येकी केवळ सात व जाचकवाडी, चैतन्यपूर गावांत प्रत्येकी सहा अर्ज दाखल झाल्याने येथे गावाच्या एकीने बिनविरोध निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भोळेवाडी चार तर घोडसरवाडी केवळ एक अर्ज दाखल झाला आहे. या दोन गावात निवडणूक रद्द होण्याची चिन्हे आहेत ?

उंचखडक खुर्द, औरंगपूर व बहिरवाडी येथे प्रत्येकी आठ उमेदवारी अर्ज दाखल असून ही तीन गावे बिनविरोधच्या उंबरठ्यावर आहेत. राजकिय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या देवठाण ६८, कोतुळ ६०, धामणगाव आवारी ४८, गणोरे ४७, धुमाळवाडी ४४, ढोकरी ३७, मेहेंदुरी ३७, ब्राम्हणवाडा ३५, लिंगदेव ३४, विरगाव ३३, कळस बुद्रुक ३२, हिवरगाव ३२, रुंभोडी ३२, कळस खुर्द २४, कुंभेफळ ३०, अंबड २८, उंचखडक बुद्रुक २६, पिंपळगाव निपाणी २०, नवलेवाडी १८, इंदोरी १५ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.माघारी नंतरच गावागावातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजपचे नेते गिरजजी जाधव, सिताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, सेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, राष्ट्रवादीचे भानुदास तिकांडे, राजेंद्र कुमकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दादापाटील वाकचौरे, मधुकर नवले, मिनानाथ पांडे यांच्या गावांमधून आलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या लक्षात घेता पुढाऱ्यांच्या गावात बिनविरोध निवडणूका होणे धूसर आहे.

...............

या गावात वाढली चुरस

टाकळी, पांगरी, निंब्रळ, मन्याळे, पिंपळगाव खांड, लहीत बुद्रुक, बेलापूर, मनोहरपूर, वाघापूर, बोरी, वाशेरे, सुगाव खुर्द, पिंपळदरी, नाचणठाव, तांभोळ, कळंब, जांभळे, परखतपूर, चितळवेढे, बदगी या गावांमध्ये ही निवडणूक चुरस वाढली आहे.

Web Title: In 1 thousand 153 arenas in Akole taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.