४८ हजारांचे घड्याळ शनीभक्ताला केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 04:19 PM2019-11-23T16:19:39+5:302019-11-23T16:19:44+5:30
शनीदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताचे ४८ हजार रुपये किंमतीचे घड्याळ नजरचुकीने विसरले होते. हे घड्याळ देवस्थाननेज त्या भाविकाला परत करण्यात आले.
सोनई : शनीदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताचे ४८ हजार रुपये किंमतीचे घड्याळ नजरचुकीने विसरले होते. हे घड्याळ देवस्थानने त्या भाविकाला परत करण्यात आले.
सानपाडा (मुंबई) येथील दिनेश बाबा सावंत हे आपल्या कुटुंबीयांसमवेत शुक्रवारी शनी दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांचे विदेशी जी.सी.कंपनीचे ४८ हजाराचे महागडे घड्याळ विसररुन राहिले. घड्याळ कुठेतरी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर सावंत यांनी शनैश्वर देवस्थानशी संपर्क केला. देवस्थानच्या वतीने लगेच सुरक्षा अधिका-यांनी सीसीटिव्ही कॅमे-याच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांचे घड्याळ स्वच्छतागृहात आढळून आले. यानंतर देवस्थानने घड्याळ सापडल्याची माहिती सावंत यांना दिली. शनिवारी दुपारी दोन वाजता दिनेश सावंत हे शिर्डीवरुन पुन्हा शिंगणापूरला आले. त्यानंतर हे घड्याळ त्यांच्या ताब्यात देण्यात आले. घड्याळ मिळाल्याने शनी शिंगणापुरात चोरी होत नसल्याचा अनुभवाची प्रचिती आल्याची भावना दिनेश सावंत यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शनैश्वर देवस्थानचे आभार मानले.
यावेळी उपकार्यकारी अधिकारी जी.के.दंरदले, नितीन शेटे, देवस्थानचे विधी सल्लागारअॅड.लक्ष्मण घावटे, सुरक्षा अधिकारी जी.बी दरंदले, सोमनाथ तवले, व्यवस्थापक संजय बानकर, गणेश कदम उपस्थित होते.