कार्यमुक्तीस नकारघंटा : जिल्हा परिषदेचे १०कर्मचा-यांवर ‘विशेष प्रेम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 10:08 AM2019-07-06T10:08:39+5:302019-07-06T10:20:19+5:30
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही दहा कर्मचाºयांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही़
अहमदनगर : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही दहा कर्मचाºयांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही़ या कर्मचाºयांवर अधिकाºयांच्या विशेष प्रेमाचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ तर काही ठिकाणी कागदोपत्रीच कर्मचाºयांची बदली झाली आहे़ वास्तविक हे कर्मचारी पूर्वीच्याच ठिकाणी काम करीत आहे़ हे सर्व खुलेआम सुरु असताना मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने कारवाई करण्यास तयार नाहीत़
जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांची बदली झाल्यानंतर त्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर झाले पाहिजे़ जे प्रामाणिक काम करणारे कर्मचारी होते, ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले़ त्यातही काही कर्मचाºयांना मनाप्रमाणे तर काही कर्मचाºयांना दुजाभावाने बदल्या दिल्या़ त्यातून कर्मचाºयांची नाराजी असली तरी त्यांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास प्रथम प्राधान्य दिले़ मात्र, विशिष्ट कर्मचाºयांवर अधिकाºयांचे ‘विशेष प्रेम’ असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही़ असे दहा कर्मचारी अधिकाºयांच्या ‘विशेष प्रेमा’चे लाभार्थी झाले आहेत़
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी विभाग प्रमुखांना पत्र पाठवून बदली झालेल्या कर्मचाºयांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे, अशा सूचना दिल्या़ तसेच बदल्या झालेले किती कर्मचारी हजर झाले, याबाबतचा अहवालही मागितला होता़ हा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाला असून, त्यात दहा कर्मचाºयांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे़ बदली झाल्यानंतर काही कर्मचाºयांनी बदलीच्या ठिकाणी हजर होऊन सही केली़ मात्र, पुन्हा वरिष्ठांच्या तोंडी आदेशाने पुन्हा पहिल्याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत़ अशा कर्मचाºयांवर प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ तोंडी आदेशावर विभागप्रमुख आपल्या लाडक्या कर्मचाºयांची ‘सोय’ करीत असतील तर बदल्यांचे ढोंग का केले जाते, असा सवालही जिल्हा परिषदेत दबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे़
किती कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले, याची माहिती मागितली होती़ ही माहिती प्राप्त झाली असून, केवळ १० कर्मचारी अद्याप बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत़ त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त केलेले नाही़ -वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा़प्ऱवि़)