नगर जिल्ह्यात २०५ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:05 PM2017-09-28T17:05:50+5:302017-09-28T17:10:52+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल ७५०५ अर्जांमधून २९४६ जणांनी माघार घेतली. यात १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. याशिवाय सर्व ग्रामपंचायतींमधून ३४९ सदस्यही बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ६३७, तर सदस्यांमधून ३५५० असे एकूण ४१८७ उमेदवार रिंगणात आहेत. ७ आॅक्टोबर रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.

10 gram panchayats unanimously elected from 205 municipal corporation | नगर जिल्ह्यात २०५ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध

नगर जिल्ह्यात २०५ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल ७५०५ अर्जांमधून २९४६ जणांनी माघार घेतली. यात १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. याशिवाय सर्व ग्रामपंचायतींमधून ३४९ सदस्यही बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ६३७, तर सदस्यांमधून ३५५० असे एकूण ४१८७ उमेदवार रिंगणात आहेत. ७ आॅक्टोबर रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.
नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचपद थेट जनतेतून निवडले जात आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सरपंचपदाच्या २०५ जागांसाठी १३२९ अर्ज आले होते. बुधवारी माघारीच्या दिवशी त्यातील जवळपास निम्म्या जणांनी (६९१) माघार घेतल्याने ६३७ जण रिंगणात आहेत.
तसेच सदस्यांच्या एकूण १९४० जागांसाठी ६१७६ अर्ज आले होते. त्यातील २२५५ जणांनी माघार घेतल्याने आता ३५५० जण रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर पाच ग्रामपंचायतींमध्ये सर्व सदस्य बिनविरोध झाले, परंतु तेथे केवळ सरपंचपदासाठी लढत होत आहे.
बिनविरोध ग्रामपंचायती
शिळवंडी (ता.अकोले), डोळासणे, कर्जुले पठार, रणखांब (ता. संगमनेर), वडगाव, भोजडे (ता. कोपरगाव), कमालपूर (ता. श्रीरामपूर), लोहगाव (ता. राहाता), ब्राम्हणगाव मांड (ता. राहुरी), म्हस्केवाडी (ता. पारनेर).
सदस्य बिनविरोध, सरपंचांत लढत
चिकणी, वडझरी, जांभूळवाडी (ता. संगमनेर), सुरेशनगर (ता. नेवासा), बनपिंप्री(ता. श्रीगोंदा) या ५ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध झाले, परंतु येथे सरपंचपदासाठी लढत होत आहे.

Web Title: 10 gram panchayats unanimously elected from 205 municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.