कर्जत येथे १०१ छात्रसैनिकांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:56+5:302020-12-23T04:17:56+5:30
कर्जत : रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयातील मेजर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये १०१ ...
कर्जत : रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयातील मेजर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये १०१ छात्रसैनिकांनी रक्तदान करून राज्य सरकारच्या आवाहनास प्रतिसाद दिल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रक्तदान करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रक्तदान करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील संरक्षण विभागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सदस्य राजेंद्र फाळके, कॉलेज विकास समितीचे सदस्य बाप्पाजी धांडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, पंचायत समिती सदस्य दिलीप जाधव आदी उपस्थित होते.
प्राचार्य बाळ कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मेजर संजय चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. किसन सुळ, कॅडेट तुषार जगताप, किरण गोरे, ईश्वर राऊत, विशाल विटेकर, हरी नन्नवरे, रोहित धांडे, गीता नेवसे, अंजली शेटे, दीपाली गावडे, विजय जाधव, सयाजी जाधव, गजानन पखाले, प्रवीण फुंदे, अक्षय गरड, शुभम कदम आदींनी परिश्रम घेतले.