जिल्ह्यात दहावीचा निकाल ९५.२७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2024 04:26 PM2024-05-27T16:26:57+5:302024-05-27T16:27:59+5:30
पारनेर तालुका अव्वल, ३४२ शाळांचा शंभर टक्के निकाल.
प्रशांत शिंदे, अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. जिल्ह्याचा दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.२७ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये पारनेर, जामखेड, श्रीगोंदा आणि अकोले तालुक्यांनी बाजी मारली आहे. श्रीरामपूर ९२.५२ टक्क्यांसह जिल्ह्यात तालुकानिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.
मुलींचा निकाल ९७.०१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.८५ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच तालुक्यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
जिल्ह्यातून मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी ६७ हजार ९७० विद्यार्थी बसले होते. यामध्ये ३७ हजार ३९३ मुले तर ३० हजार ५७७ मुली होत्या. यापैकी ६४ हजार ७६१ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये ३५ हजार ९७ मुले तर २९ हजार ६६४ मुली आहेत.
३४२ शाळांचा शंभर टक्के निकाल-
जिल्ह्यात ३४२ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये नगर - ४८, अकोले - ४६, संगमनेर- ४१, पारनेर - ३५, श्रीगोंदा - २५, पाथर्डी - २६, नेवासा - २२, राहुरी - १७, श्रीरामपूर -१७, राहाता- १६, कोपरगाव- १६, कर्जत - १६, शेवगाव- १०, जामखेड - ७
गतवर्षी पेक्षा टक्केवारी वाढली-
गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९४.४८ टक्के लागला होता. यामध्ये देखील मुलींनीच बाजी मारली होती. मुलांचा निकाल ९२.७९ तर मुलींचा निकाल ९६.६२ टक्के लागला होता. मागील वर्षी श्रीगोंदा तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला होता. तर जिल्ह्यात २७६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता.
तालुकानिहाय निकाल-
तालुका - निकाल
पारनेर - ९६.५३
जामखेड - ९६.५०
श्रीगोंदा - ९६.४२
अकोले - ९६.३६
कर्जत - ९५.९९
कोपरगाव - ९४.३३
नगर - ९५.३३
नेवासा - ९५.७३
पाथर्डी - ९५.७३
राहाता - ९४.४३
राहुरी - ९३.२३
संगमनेर - ९५.६०
शेवगाव - ९५.८९
श्रीरामपूर - ९२.५२