श्वानाला ११ फैरींची सलामी

By Admin | Published: May 18, 2016 11:47 PM2016-05-18T23:47:32+5:302016-05-18T23:59:03+5:30

अहमदनगर : जबरी चोऱ्या, दरोड्यातील आरोपी थेट शोधणाऱ्या नगर जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील ‘संतोष’चा मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने मृत्यू झाला.

11 Ferries salute to Schwannel | श्वानाला ११ फैरींची सलामी

श्वानाला ११ फैरींची सलामी

अहमदनगर : जबरी चोऱ्या, दरोड्यातील आरोपी थेट शोधणाऱ्या नगर जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील ‘संतोष’चा मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने मृत्यू झाला. बुधवारी दुपारी पोलीस मुख्यालयात त्याला अखेरची शोक सलामी देण्यात आली. अंत्यसंस्कारप्रसंगी पोलिसांचेही हृदय हेलावले.
श्वान पथकातील ‘संतोष’ हा श्वान अनेक महिन्यांपासून आजारी होता. रेल्वे स्टेशन भागातील पशुचिकित्सालयात त्याला मंगळवारी उपचारासाठी दाखल केले असता तेथेच मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बुधवारी दुपारी त्याच्यावर पोलीस मुख्यालयात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याला सलामी दिली. संतोष या श्वानाचा जन्म ३० मार्च २०११ रोजी झाला होता. सोलापूर येथील कॅनॉल क्लब येथून तो तीन महिन्याचा असताना पोलीस दलाने त्याला विकत घेतले होते. त्यानंतर आधी नगर येथे सहा महिने आणि नंतर पुणे येथे नऊ महिने संतोषला प्रशिक्षण दिले. श्वान हस्तक असलेले सहायक फौजदार सुभाष गव्हाणे आणि पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब नरे यांनी त्याला प्रशिक्षित केले होते. पुणे येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१२ मध्ये संतोषला नगर जिल्हा पोलीस दलात सामावून घेण्यात आले होते. म्हणजे तब्बल पाच वर्षे त्याने पोलीस दलात सेवा दिली.
गेल्या काही दिवसांपासून संतोष आजारी होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर पोलीस मुख्यालयात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने ११ फैरी झाडून संतोषला मानवंदना दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) आनंद भोईटे, उपअधीक्षक (शहर) बजरंग बनसोडे, कोतवाली पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, मुख्यालयाचे सहायक निरीक्षक एस. आर. मंडलकर, राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राशिनकर, पोलीस उपनिरीक्षक संदिपान बावळे, बॉम्बशोध पथक व पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
२०१२ मध्ये श्रीगोंदा येथील जबरी चोरी व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस संतोषने थेट पकडले होते. २०१३ मध्ये पाथर्डी येथील खून प्रकरणातील आरोपीस संतोषने थेट दाखविले. २०१४ मध्ये लिंपणगाव-श्रीगोंदा हद्दीतील खून प्रकरणातील आरोपीचा मागही यशस्वीपणे काढला. पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला ओळखण्यात संतोषची कामगिरी अव्वल ठरली. बेलवंडी येथील फसवणुकीच्या गुन्ह्यातील पतसंस्था चोरीतील १२ लाख रुपये व आरोपीचा थेट माग काढला होता.

Web Title: 11 Ferries salute to Schwannel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.