११ खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:20 AM2021-01-22T04:20:28+5:302021-01-22T04:20:28+5:30
मतदार दिवसानिमित्त कार्यक्रम अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५ जानेवारीला अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात ...
मतदार दिवसानिमित्त कार्यक्रम
अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५ जानेवारीला अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्तचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे होणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. या वर्षी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
-----------
धार्मिक स्थळांवरील पुस्तिका
अहमदनगर : नगर जल्लोष (ट्रस्ट)च्या संकल्पनेतून आणि हॉटेल द व्हिलेजच्या सहकार्याने अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांची माहिती असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कार्यक्रम समितीप्रमुख व माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी दिली. या कार्यक्रमास राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जामंत्री प्राजक्त तानपुरे, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार दिलीप गांधी, पद्मश्री पोपटराव पवार, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, उजक फिरोदिया आदींसह उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम २४ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता सावेडी येथील बंधन लॉन येथे होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.