११० बंदिस्त मच्छीपालनाचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:03+5:302021-03-28T04:19:03+5:30
राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असलेल्या ११० बंदिस्त मच्छीपालनाला गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे ...
राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असलेल्या ११० बंदिस्त मच्छीपालनाला गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुळा धरणावर होतकरू तरुणांनी बंदिस्त मच्छीपालन सुरू केले. यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदानही प्राप्त झाले होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे मच्छीपालनाचे पिंजरे तुटून गेले. त्यामुळे काही जाळ्याही बुडाल्या. केज प्रकल्पामधील रूमही बुडाल्या. मत्स्य विभागाचे साहाय्यक आयुक्त भोसले यांनी केजला भेट देऊन बुधवारी (दि. २४) पंचनामा केला. केज प्रकल्पाचे नुकसान झाल्यामुळे मच्छी उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहे. मागील वर्षीही बंदिस्त मच्छीपालनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
...
गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे मच्छीपालन प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिंजरे तुटून गेले आहेत. जाळ्या बुडाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
- शरद बाचकर,
बंदिस्त मच्छीपालन व्यावसायिक