बारावीची परीक्षा सुरु होती, फुड पॉयझनमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 10:21 AM2023-03-07T10:21:33+5:302023-03-07T10:21:54+5:30

प्रवारानगर केंद्रावरती तिचे बारावी बोर्डाचे पेपर चालू होते. प्रथम इंग्रजीचा व दुसरा भौतिकशास्त्रचा पेपर तिने दिला होता.

12th exam begins, student tejaswini dighe dies due to food poisoning in Ahmadnagar rahata | बारावीची परीक्षा सुरु होती, फुड पॉयझनमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

बारावीची परीक्षा सुरु होती, फुड पॉयझनमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

राहाता (जि. अहमदनगर):  तालुक्यातील लोणी खुर्द येथील सध्या बारावी बोर्डाचे पेपर देत असलेली मुलगी तेजस्विनी मनोज दिघे हिचा सोमवारी दुपारी फूड पॉइझनमुळे  मृत्यू झाला आहे. 
        
बाभळेश्वर येथील कॉलेजमध्ये ती शिकत होती, एम. जी. कॉलेज,  प्रवारानगर केंद्रावरती तिचे बारावी बोर्डाचे पेपर चालू होते. प्रथम इंग्रजीचा व दुसरा भौतिकशास्त्रचा पेपर तिने दिला होता. परंतु  तिसऱ्या रसायनशास्त्र पेपरच्या दिवशी बुधवारी सकाळी तेजस्विनी व तिच्या आजोबाने रात्रीचे शिळे इडली- सांबर खाल्ले होते. पोटाचा त्रास होताच लोणी येथील पीएमटी दवाखान्यात नंतर, संगमनेर दवाखान्यात हलविण्यात आले, परंतु निदान होत नसल्याने पुणे येथील केम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. परंतु सोमवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.

तिचे आजोबा रयतचे माजी मुख्याध्याक बिमराज दिघे यांनाही  फूड पॉइझन झाले. परंतु त्यांची तब्येत बरी असल्याने त्यांना  दोन दिवसात दवाखान्यातून सोडणार आहेत. तेजस्विनी ही सायन्स शाखेत  वर्गात हुशार होती. पुढे तिचे डॉकटरकीचे स्वप्न होते.

Web Title: 12th exam begins, student tejaswini dighe dies due to food poisoning in Ahmadnagar rahata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.