ट्रेडिंगच्या नावाखाली 13 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक

By अण्णा नवथर | Published: August 12, 2023 10:15 AM2023-08-12T10:15:22+5:302023-08-12T10:15:22+5:30

13 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

13 Crore 49 Lakh fraud in the name of trading | ट्रेडिंगच्या नावाखाली 13 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक

ट्रेडिंगच्या नावाखाली 13 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक

अहमदनगर- ईडलवाईज ब्रोकर इंडिया लिमिटेड कंपनी मध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे अमित दाखवून  13 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी तिघा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर मधील अनेक जणांची अशाप्रकारे फसवणूक केली गेल्याची शक्यताही असून. हा आकडा मोठा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे, निहाल बाळासाहेब काळे, ( सर्व राहणार स्वामी बंगला रूपमाता नगर सावेडी सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  याबाबत प्रियंका शैलेंद्र सूरपुरिया( देना बँक कॉलनी, हॉटेल प्रेमदान जवळ, सावेडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी याने ईडलवाईज ब्रोकर लिमिटेड कंपनी मध्ये गुंतवणूक करून दरमहा दर महिन्याला पाच टक्के परतावा देतो ,असे सांगून फिर्यादी व त्यांचे पती तसेच इतर सहकाऱ्यांकडून सन 2019 ते ऑक्टोबर 2022, या कालावधी वेळोवेळी 13 कोटी 49 लाख रुपये बँक च्या खात्यावर घेतले.

काही दिवस फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना परतावा देखील दिला. मात्र त्यानंतर त्याने परतावा देणे बंद केले. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी काळे यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्याने आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही डबघाईला गेलो आहे. आम्ही तुमचे पैसे परत करू शकत नाही. तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची असेल तर करा, असे सांगून फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.सी. मुजावर हे करत आहेत.

Web Title: 13 Crore 49 Lakh fraud in the name of trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.