शेवगांव तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामासाठी 13 कोटी रुपये मंजूर : आमदार मोनिका राजळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 04:52 PM2019-02-06T16:52:12+5:302019-02-06T16:52:33+5:30
शेवगांव तालुक्यातील १७ किलोमीटर अंतराच्या पाच रस्त्याच्या कामांना रुपये १३ कोटीची प्रशासकीय मंजुरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंर्तगत मिळाली असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
ढोरजळगाव : शेवगांव तालुक्यातील १७ किलोमीटर अंतराच्या पाच रस्त्याच्या कामांना रुपये १३ कोटीची प्रशासकीय मंजुरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंर्तगत मिळाली असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचेकडे या रस्त्यांच्या कामांचा सातत्याने पाठपुरावा करुन मोठा निधी मिळाला असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
राष्ट्रीय मार्ग ६१ (घोटन) ते नलगेवस्ती रस्त्यासाठीे २ कोटी ५६ लाख रुपये, तळणी ते दहिफळ रस्त्यासाठी ४ कोटी ७० लक्ष, जिल्हा मार्ग ७७ ते दिंडेवाडी ते चव्हाणवस्ती रस्त्यासाठी १ कोटी ५८ लक्ष, नागलवाडी ते लमानतांडा(सेवालाल तांडा) १ कोटी ६० लक्ष, शिंगोरी ते चेमटेवस्ती रस्ता २ कोटी ४७ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शेवगांव-पाथर्डी मतदारसंघात सन २०१५-१६ पासून आजपर्यत १६४ किलोमीटर लांबीच्या रुपये ९८ कोटी किमतीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.