१९० दिवसांत १३ लाख १३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:09+5:302021-05-13T04:20:09+5:30
५ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना व ३० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचा निर्णय अत्यंत लाभदायी व राज्याला दिशादर्शक ...
५ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना व ३० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचा निर्णय अत्यंत लाभदायी व राज्याला दिशादर्शक ठरला आहे. २०२०–२१ या चालू हंगामात कारखान्यासमोर अनेक अडचणी होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव व त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन, साखरेचे कमी झालेले दर या सर्व अडचणींवर मात करत कारखान्याने आपला लौकिक कायम ठेवला आहे. यापूर्वी या कारखान्याने ११ लाख ५३ हजार मेट्रिक टनाचे गाळप केले होते. तो उच्चांक यावर्षी मोडीत काढला आहे. तसेच नव्याने सुरू केलेल्या डिस्टिलरी प्रकल्पातून ९२ लाख लिटरचे उत्पादन झाले आहे. तर विद्युत निर्मितीतून ५३ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. या सर्व कार्यकाळात राज्यभरातील कारखान्यांमध्ये ऊस गाळपात पहिल्या पंधरामध्ये थोरात कारखाना अग्रभागी राहिला आहे.