श्री राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतनच्या १३० विद्यार्थ्यांनी बसवले शाडू मातीचे गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:28+5:302021-09-16T04:27:28+5:30
निंबळक : बोल्हेगाव (ता. नगर) येथील नवनाथ सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्री राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतनमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात ...
निंबळक : बोल्हेगाव (ता. नगर) येथील नवनाथ सेवा मंडळ ट्रस्ट संचलित श्री राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतनमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेतील १३० विद्यार्थ्यांनी घरी शाडूच्या मातीपासून बनवलेले गणपती बसवले. मुख्याध्यापक अमोल शिंदे यांनी याबाबत मार्गदर्शन केले. वंदना पुरनाळे व शुभांगी नायर यांनी ऑनलाईन पद्धतीने इको फ्रेंडली गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेतली.
या गणेशोत्सवात विद्यालयाने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती व आरास स्पर्धेचे आयोजन केले होते. किरण डहाणे, उमेश भोईटे, वैशाली अकोलकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन परीक्षण करण्यात आले. यामध्ये यश शिंदे (इयत्ता पाचवी) प्रथम क्रमांक, विशाखा वाटमोडे (इयत्ता दुसरी) द्वितीय क्रमांक, अंबिका बिराजदार (इयत्ता सातवी) व शिवम दत्तात्रय कचरे (बालवाडी) यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांचे व या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष बाबुराव खालकर, सचिव भाग्यश्री फोडकर, खजिनदार मदन आढाव व विश्वस्त मंडळाने कौतुक केले.
-----
१५ राघवेंद्र स्वामी
बोल्हेगाव येथील श्री राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतनमध्ये इको फ्रेंडली गणेशमूर्तीबाबत कार्यशाळा घेण्यात आली.