जिल्ह्यात १३ हजार जण निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:26+5:302021-01-08T05:03:26+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या ...

13,000 people in the election arena in the district | जिल्ह्यात १३ हजार जण निवडणुकीच्या रिंगणात

जिल्ह्यात १३ हजार जण निवडणुकीच्या रिंगणात

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ४) ९ हजार १० जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता ७२१ ग्रामपंचायतीसाठी १३ हजार १९४ जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीच्या ७ हजार १३४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ७२१ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ हजार ६४ नामनिर्देशन पत्र ऑनलाईन तर ४ हजार ५७० ऑफलाईन असे एकूण २३ हजार ८०१ ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये ६५५ अर्ज बाद झाले, त्यामुळ‌े २३ हजार १४८ अर्ज शिल्लक राहिले होते. त्यापैकी ९ हजार १० जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता १३ हजार १९४ जणांमध्ये आता लढत होणार आहे.

---

तालुकानिहाय निवडणूक

तालुका ग्रा.पं. संख्या उमेदवार संख्या बिनविरोध ग्रा.पं.

अकोले ५२ ५६६ ०

संगमनेर ९० १४८२ ४

कोपरगाव २९ ५९८ ०

श्रीरामपूर २६ ५७७

राहाता १९ ५७० ६

राहुरी ४४ ६६३ ०

नेवासा ५२ १०२० ७

नगर ५६ ११७२ ३

पारनेर ७९ १३५० ९

पाथर्डी ७५ १३२० ३

शेवगाव ४८ ८४३ ०

कर्जत ५४ १००३ २

जामखेड ३९ ७३४ १०

श्रीगोंदा ५८ १०९६ १

एकूण ७२१ १३१९४ ४६

-----------

डमी-नेट फोटो- ०५ ग्रामपंचायत फायनल लिस्ट

इतर फोटो -नेट फोटोत

Web Title: 13,000 people in the election arena in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.