अकोले तालुक्यात १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:21 PM2020-07-29T12:21:58+5:302020-07-29T12:22:35+5:30
अकोले तालुक्यात बुधवारी (२९ जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालात एकाचवेळी नवे १४ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ११० पोहोचली आहे.
अकोले : तालुक्यात बुधवारी (२९ जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालात एकाचवेळी नवे १४ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ११० पोहोचली आहे.
अकोले तालुक्यातील माणिक ओझर येथे तब्बल १० तर राजुरला दोन, वाघापूर एक व निब्रळ एक अशा १४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात सकाळीच तालुक्यातील माणिक ओझर येथील ४, पुरुष ३ महिला व तीन लहान मुलांसह १० जण, राजूर येथील ६० व ३० वर्षीय पुरुष, वाघापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, निब्रळ येथील २१ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अकोले तालुक्यात रुग्णांची एकूण संंख्या ११० झाली आहे. त्यापैकी ६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ४१ जणांवर उपचार सुरु आहेत.