न्यू आर्टस महाविद्यालयाच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; सायकलिंग, ज्युदो, बॉक्सिंग खेळात चमकदार कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:45 PM2018-01-24T12:45:51+5:302018-01-24T12:46:54+5:30
शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे १४ खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. तसेच पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी ८० खेळाडूंची निवड झाली आहे.
अहमदनगर : शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या खेळाडूंची चालू शैक्षणिक वर्षात २०१७-१८ सालात १४ खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. तसेच पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी ८० खेळाडूंची निवड झाली आहे.
राजस्थानमधील बिकानेर येथे होणा-या सायकलिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी विकास रोठे याची निवड झाली आहे. सायकलिंग ट्रॅक स्पर्धेसाठी कुणाल कराळे, गोदावरी शिंदे, शुभम शिंदे यांची चंदीगढ येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर चंदिगढमध्ये ज्युदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी गणेश लांडगे, शुभम दातरंगे, आदित्य सईद, प्रियंका डोंगरे यांची निवड झाली आहे. ऐश्वर्या वाघ हिची बॉक्सिंगमध्ये निवड झाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे होणा-या खो-खो स्पर्धेसाठी निकीता मरकड झाली आहे. तिने अश्वमेध स्पर्धेत सिल्व्हर पदकाची कमाई केली आहे. फुटबॉल स्पर्धेसाठी महेश पटेकरची निवड झाली आहे. फुटबॉल स्पर्धा भोपाळमध्ये रंगणार आहेत. झारखंडमधील रांची येथे होणा-या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रियंका वाकचौरे निवड झाली आहे. कबड्डी स्पर्धेसाठी दापोली येथे रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी राहुल आगळे याची निवड झाली आहे. पंजाब येथे होणा-या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी अक्षय काळे याची निवड झाली आहे. काळे याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा स्टॉगमॅन हा किताब पटकाविला. खेळाडूंना डॉ. शरद मगर, प्रा. धन्यकुमार हराळ, प्रा. धनंजय लाटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.